Italian PM Giorgia Meloni : ट्रम्प, मोदी आणि मला ‘लोकशाहीसाठी धोका’ म्हटले जाते !

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची साम्यवादी पक्षांवर टीका !

डावीकडून डॉनल्ड ट्रम्प,जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

रोम (इटली) – ९० च्या दशकात जेव्हा बिल क्लिंटन (अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष) आणि टोनी ब्लेअर (ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान) यांनी जागतिक डाव्या (साम्यवादी) विचारसरणीचे उदारमतवादी जाळे निर्माण केले, तेव्हा त्यांना ‘राजकारणी’ म्हटले गेले. आज जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मायली, मी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतो, तेव्हा आम्हाला ‘लोकशाहीसाठी धोका’ म्हटले जाते, अशी टीका इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी डाव्या विचारसरणीवर केली. त्या अमेरिकेतील ‘कंझर्व्हेटिव्ह पॉलिटिकल ॲक्शन कॉन्फरन्स’ला ऑनलाईन संबोधित करत होत्या.

रूढीवादी जिंकत आहेत !

पंतप्रधान मेलोनी म्हणाल्या की, हे डाव्यांचे दुटप्पीपणाचे मानक आहे; पण आम्हाला त्याची सवय झाली आहे. चांगली बातमी अशी आहे की, ते आमच्यावर कितीही चिखलफेक करत असले तरी, लोक आता त्यांच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. नागरिक आम्हाला मतदान करत रहातात. रूढीवादी वाढतच आहेत आणि ते युरोपीय राजकारणात अधिकाधिक प्रभावशाली होत आहेत; म्हणूनच डावे घाबरले आहेत. ट्रम्प यांच्या विजयामुळे त्यांची चिडचिड उन्मादात पालटली आहे, केवळ रूढीवादी जिंकत असल्यानेच नाही, तर रूढीवादी आता जागतिक स्तरावर सहयोग करत आहेत.

या परिषदेला संबोधित करतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही एक नवीन आणि चिरस्थायी राजकीय बहुमत निर्माण करणार आहोत जे येणार्‍या पिढ्यांसाठी अमेरिकेतील राजकारणाला चालना देईल.

संपादकीय भूमिका 

‘साम्यवाद म्हणजे आसुरी मानसिकता’, असेच म्हणावे लागले. साम्यवाद्यांनी जगात इतकी हत्याकांडे केली आहेत, त्याची गणतीच नाही. असे हुकूमशाही साम्यवादी जगातून नष्ट झाल्यावरच शांतता निर्माण होईल !