
वॉशिंग्टन (अमेरिका) – आमचे सरकार प्रत्येक अमेरिकी कुटुंबाला ५ सहस्र अमेरिकी डॉलर्स (४ लाख ३३ सहस्र रुपये) देईल. ही रक्कम डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीद्वारे (‘डीओजीई’द्वारे) निर्माण होणार्या बचतीतून देण्यात येईल, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी केली. ‘डीओजीई’ ही एक सल्लागार संस्था आहे, जी सरकारी खर्च अल्प करण्याचे काम करते.
मियामी येथील एका कार्यक्रमाला संबोधित करतांना ट्रम्प म्हणाले की, ‘डीओजीई’कडून होणार्या बचतीपैकी २० सहस्र कोटी रुपये अमेरिकी नागरिकांना परत केले जातील. याचा अर्थ प्रत्येक अमेरिकी कुटुंबाला ५ सहस्र डॉलर्स मिळतील.
संपादकीय भूमिकासरकारने बचत केल्यास त्याचा लाभ जनतेला होतो, हेच ट्रम्प यातून दाखवून देत आहेत. भारतात याउलट चालू आहे. प्रशासनाकडून उधळपट्टी होते आणि जनतेला काहीच मिळत नाही ! |