पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून केलेल्या योग्य नियोजनामुळे दीपावली काळात भाविकांना दर्शन घेणे सुलभ !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून योग्य नियोजन आणि काळजी घेतल्याने भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय झाली नाही, तसेच चोरी-गैरवर्तन अशा गोष्टींना आळा बसला. याविषयी भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

दिवाळीनिमित्त कोपर्डी हवेली (तालुका कराड) येथे प्रवचन पार पडले !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘दिवाळी सणाचे महत्त्व’ तसेच ‘हलालमुक्त दिवाळी कशा पद्धतीने साजरी करावी ?’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी ४० युवक-युवती ग्रामस्थ उपस्थित होते.

राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त आमदारांना ८० लाखांची भेट !

राज्य सरकारने सर्व आमदारांना दिवाळीनिमित्त स्थानिक विकासनिधीतून प्रत्येकी ८० लाख रुपयांची भेट दिली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर २२९ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

गोवर्धनगिरिधारी श्रीकृष्ण !

भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून धरून इंद्राच्या कोपापासून गोकुळवासियांचे रक्षण केले. ‘आपला अन्नदाता आणि रक्षणकर्ता गोवर्धन पर्वतच आहे’, याची सर्वांना खात्री पटली अन् त्यांची श्रीकृष्णावरील भक्तीही वाढली. शेवटी इंद्र थकला आणि त्याने वृष्टी बंद केली. पुन्हा सर्व लोक गोकुळात आले.

यमद्वितीयेचे रहस्य !

‘कार्तिक शुक्ल द्वितीया हा दिवस ‘यमद्वितीया’ या नावाने भारतवर्षांत प्रसिद्ध आहे. त्या निमित्ताने…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नरकासुर प्रतिमादहन करण्याच्या प्रकारांत मोठ्या प्रमाणात वाढ

गोवा राज्यात प्रामुख्याने चालणारी ही कुप्रथा आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पसरू लागली आहे. नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात सर्वत्र नरकासुराच्या प्रतिमा बनवणे आणि त्याच्या स्पर्धा आयोजित यांचे प्रमाण पुष्कळ वाढल्याचे स्पष्ट झाले.

गोव्यात नरकासुरदहन प्रथेतील गैरप्रकारांमुळे नागरिक त्रस्त

पूर्वी गोव्यात गावात १ याप्रमाणे मनुष्याच्या उंचीहून थोड्या अधिक उंचीच्या प्रतिमा बनवून त्या दहन केल्या जात असत. त्यानंतर मोठमोठ्या प्रतिमा बनवून त्यांच्या स्पर्धा घेण्याचा अपप्रकार चालू झाला. ज्यामध्ये श्रीकृष्णाऐवजी नरकासुरालाच अधिक महत्त्व दिले जाऊ लागले !

हिंदु राष्ट्र करण्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलन उभे करणे आवश्यक ! – विश्वनाथ कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

राज्यघटनेत दुरुस्ती करून भारताला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ करता येऊ शकते. त्याप्रमाणे घटनेत सुधारणा करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित का करता येऊ शकत नाही ? भारताला परत हिंदु राष्ट्र करण्यासाठी एक मोठे आंदोलन उभे करण्याची आवश्यकता आहे.

हे सरकारला कळत कसे नाही ?

‘फटाके वाजवू नका’, असे कोट्यवधी लोकांना सांगण्यापेक्षा कायदा करून ‘फटाके विकू नका, फटाके बनवू नका’, असे सांगणे सुलभ आहे. हे सरकारला कळत कसे नाही ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले