हिंदूंनो, ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करा !

हलाल प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेद्वारे मिळणारे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न शासनाला न मिळता काही इस्लामी संघटनांना मिळत आहे. निधर्मी भारतात अशी ‘धर्माधारित समांतर अर्थव्यवस्था’ निर्माण केली जाणे, हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे.

सध्या दिवाळी साजरी करण्याचे पालटलेले स्वरूप, म्हणजे कष्ट करावे लागू नयेत, यासाठी काढलेली पळवाट !

सध्या दिवाळी साजरी करण्यासाठी कुटुंब कबिला (काही कुटुंबे) कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी (‘हिल स्टेशन’वर) मांसाहारादी चापायला निघून जातो. नातेवाईक घरी यायला नकोत आणि दिवाळीचा फराळ बनवायला नको, यांसाठी काढलेली ही युक्ती भलतीच लोकप्रिय झालेली आहे.

धर्म-राष्ट्र जागृती करणारा ‘सनातनचा आकाशकंदिल’

हिंदूंमध्ये धर्म आणि राष्ट्र यांच्याप्रती जागृती निर्माण होण्याची आवश्यकता आहे. असे झाले तरच दिवाळी ही खर्‍या अर्थाने साजरी होऊ शकेल. हाच संदेश सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी ‘सनातन संस्था’ धर्मजागृती आणि राष्ट्रजागृती करणारे लिखाण असलेल्या आकाशकंदिलाची निर्मिती करते.

देवदिवाळी

आपले कुलदैवत आणि इष्टदेवता यांच्याबरोबरच स्थानदेवता, वास्तूदेवता, ग्रामदेवता आणि गावातील अन्य मुख्य अन् उपदेवता यांचे, तसेच महापुरुष, वेतोबा इत्यादी निम्नस्तरीय देवता यांचे पूजन करून त्यांना त्यांच्या मानाचा भाग पोचवण्याचे कर्तव्य या दिवशी पार पाडले जाते. देवदिवाळीला पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो.

दीपावलीचे महत्त्व

‘दिवाळी’ हा शब्द ‘दीपावली’ या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात.

लक्ष्मीपूजन

‘प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध, ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा या दिवसाचा विधी आहे.

नरक चतुर्दशी

मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन कृष्ण चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले.

‘दीप’

‘दीप्यते दीपयति वा स्वयं परं चेति ।’ म्हणजे ‘स्वतः प्रकाशतो आणि दुसर्‍यांना प्रकाशित करतो तो दीप.’ दीप किंवा दीपज्योत हे बुद्धी आणि ज्ञान यांचे प्रतीक आहे. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ म्हणजे ‘अज्ञानरूपी तिमिराकडून ज्ञानरूपी प्रकाशज्योतीकडे ने’, असा त्याचा अर्थ आहे.

बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा)

या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. पुरुष हे शिवाचे आणि स्त्री हे दुर्गादेवीचे प्रतीक आहे. ओवाळल्यामुळे पत्नीमध्ये दुर्गातत्त्व कार्यान्वित होते आणि पतीचे औक्षण केल्यानंतर त्याची कुंडलिनीशक्ती जागृत होऊन त्याच्यातील सुप्तावस्थेत असणारे शिवतत्त्व प्रकट होते.

भाऊबीज (यमद्वितीया)

‘या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वतःच्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल, तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे.’