प्रयागराज (उत्तरप्रदेश) – संपूर्ण विश्वात हिंदूंचे एकही राष्ट्र नाही. राज्यघटनेत दुरुस्ती करून भारताला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ करता येऊ शकते. त्याप्रमाणे घटनेत सुधारणा करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित का करता येऊ शकत नाही ? त्यामुळे भारताला परत हिंदु राष्ट्र करण्याच्या मागणीसाठी एक मोठे आंदोलन उभे करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी केले. येथील शांतीपुरम्मधील रुद्रप्रयाग विद्या मंदिरामध्ये हिंदूसंघटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन रुद्रप्रयाग विद्या मंदिराचे मुख्य व्यवस्थापक श्री. सत्येंद्र द्विवेदी यांनी केले होते. या वेळी सनातन संस्थेचे श्री. गुरुराज प्रभु उपस्थित होते.
प्रयागराज में हिन्दू राष्ट्र संगोष्टी में धर्मप्रेमियों ने की प्रतिज्ञा !
इस बार दीपावली को हलाल प्रमाणित एक भी वस्तु न खाऊंगा ना खरीदूंगा ।
इसके बारे में जन-जन में जागृति करूंगा ।
हलाल मुक्त दीपावली से हलाल मुक्त भारत तक….@HinduJagrutiOrg pic.twitter.com/8OpCguhurl
— Vishwanath Kulkarni (@vishwanathkul) October 17, 2022
क्षणचित्र : या बैठकीमध्ये ‘दिवाळीत हलाल प्रमाणित वस्तू खरेदी करणार नाही’, अशी प्रतिज्ञा करण्यात आली.