दिवाळीनिमित्त कोपर्डी हवेली (तालुका कराड) येथे प्रवचन पार पडले !

हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुधा जाधव

कराड, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘धर्मशास्त्रानुसार दिवाळी कशी साजरी करावी ?’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोपर्डी हवेली (तालुका कराड) येथील नरसिंह मंदिरात प्रवचन पार पडले. त्याचे आयोजन कोपर्डी हवेली येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. प्रदीप साळवे यांनी केले होते.

समितीच्या वतीने सौ. सुधा जाधव यांनी ‘दिवाळी सणाचे महत्त्व’ तसेच ‘हलालमुक्त दिवाळी कशा पद्धतीने साजरी करावी ?’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी ४० युवक-युवती ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांमधून या ठिकाणी नियमितपणे ‘धर्मशिक्षण वर्ग’ घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे.