पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून केलेल्या योग्य नियोजनामुळे दीपावली काळात भाविकांना दर्शन घेणे सुलभ !

श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर

कोल्हापूर – दीपावलीच्या कालावधीत सलग सुटी असल्याने भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. २४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत ४ लाख ७२ सहस्त्राहून अधिक भाविकांनी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले.

भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी पहाता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या ‘सी.सी.टी.व्ही.’ नियंत्रण कक्षाकडून योग्य नियोजन आणि काळजी घेतल्याने भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय झाली नाही, तसेच चोरी-गैरवर्तन अशा गोष्टींना आळा बसला.

याविषयी भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.