सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
फटाक्यांविषयींच्या कायद्यांचे सर्रास उल्लंघन होऊ देणार्या पोलिसांना तात्काळ निलंबित करा !
‘गणेशोत्सव, दिवाळी आदी सणांच्या काळात फटाक्यांचे मोठमोठे आवाज बर्याच ठिकाणी रात्री २ – ३ वाजेपर्यंत ऐकू येतात. त्यामुळे रात्री २-३ वाजेपर्यंत झोप लागत नाही. ध्वनीप्रदूषणाचे कायदे असूनही पोलीस यावर कारवाई करत नाहीत. रात्रभर होणारे ध्वनीप्रदूषण ऐकू न येण्याइतके पोलीस बहिरे आहेत का ? अशा कामचुकार पोलिसांना तात्काळ निलंबित करा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
हे सरकारला कळत कसे नाही ?
‘फटाके वाजवू नका’, असे कोट्यवधी लोकांना सांगण्यापेक्षा कायदा करून ‘फटाके विकू नका, फटाके बनवू नका’, असे सांगणे सुलभ आहे. हे सरकारला कळत कसे नाही ?’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
फटाक्यांवर पैसे खर्च करू नका !
‘फटाक्यांवर पैसे खर्च न करता साधना करणार्या गरिबांना किंवा साधना शिकवणार्या धार्मिक संस्थांना दान द्या !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले