गोव्यात नरकासुरदहन प्रथेतील गैरप्रकारांमुळे नागरिक त्रस्त

  • ध्वनीप्रदूषणाच्या ८५ तक्रारी नोंद

  • रस्त्यावरच प्रतिमा जाळल्याने रस्तेही खराब आणि वाहनचालकांचीही गैरसोय !

‘नरकासुर दहन’ स्पर्धेत शिरलेले अपप्रकार

पणजी – गोव्यात नरकचतुर्दशीच्या निमित्ताने नरकासुराच्या प्रतिमा बनवून त्या पहाटे दहन करण्याची प्रथा आहे. या प्रथेत गेल्या काही वर्षांत अनेक अपप्रकार शिरले आहेत. यांपैकी काही अपप्रकारांमुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. यंदा पणजी भागात अनेक ठिकाणी नरकासुराच्या प्रतिमा बनवून त्या डांबरी रस्त्याच्या मधोमध जाळण्यात आल्या. त्यानंतर ती जागा स्वच्छ न करता प्रतिमा जाळल्यानंतरची राख, प्रतिमा बनवण्यासाठी वापरण्यात आलेला लोखंडी सांगाडा, खिळे आदी टोकदार वस्तू राखेत तशाच ठेवल्याने वाहनचालकांच्या वाहनांची चाके ‘पंक्चर’ होण्याची (चाकाला भोक पडून हवा जाण्याची) भीती निर्माण झाली आहे. यामुळे रस्तेही खराब झाले आहेत. पणजीप्रमाणे राज्यात अन्यत्रही असे प्रकार घडले आहेत.

ररस्त्यावर मधोमध जाळण्यात आलेल्या नरकासुर प्रतिमा आणि नंतर जमलेला कचरा दिसत आहे

ध्वनीप्रदूषणाच्या ८५ तक्रारी नोंद

त्याचप्रमाणे कर्कश आवाजात डिजे यंत्रणेवर संगीत लावल्याने झालेल्या ध्वनीप्रदूषणामुळे आजारी, वृद्ध, लहान मुले यांना त्रास झाल्याच्या राज्यात एकूण ८५ तक्रारी पोलिसांनी नोंद केल्या आहेत. यांपैकी ७१ तक्रारी उत्तर गोव्यात, तर १४ तक्रारी दक्षिण गोव्यात नोंद झाल्या आहेत. यांपैकी बहुतांश तक्रारींवर कारवाई केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. नोंद झालेल्या तक्रारी हे हिमनगाचे टोक असून अनेक ठिकाणी होणारे ध्वनीप्रदूषण लोकांनी निमूटपणे सहन केल्याच्याच घटना अधिक आहेत.

(सौजन्य : Prudent Media Goa) 

अंदाजे ३०-३५ वर्षांपूर्वी गोव्यात गावात १ याप्रमाणे मनुष्याच्या उंचीहून थोड्या अधिक उंचीच्या प्रतिमा बनवून त्या दहन केल्या जात असत. त्यानंतर मोठमोठ्या प्रतिमा बनवून त्यांच्या स्पर्धा घेण्याचा अपप्रकार चालू झाला. या स्पर्धांमध्ये ज्या श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला त्याला महत्त्व न देना नरकासुरालाच अधिक महत्त्व दिले जाते. या प्रथेच्या नावाखाली गेल्या अनेक वर्षांपासून ध्वनीप्रदूषण, प्रतिमा रस्त्यावर जाळणे, रस्त्यांवरील विजेच्या तारांना टेकतील अशा प्रतिमा बनवून धोका निर्माण करणे, मद्यपान करून अर्वाच्च भाषेत बोलणे, शिवीगाळ करणे, लोखंडी सांगाडा बनवण्यासाठी अवैधरित्या वीज वापरणे आदी अपप्रकार होत आहेत. सनातन संस्थेसह अनेक समाजसेवी संघटनांनी याविषयी प्रबोधन करूनही राजकीय स्तरावर याची नोंद घेतली जात नसल्याने हे अपप्रकार करण्यात युवा पिढीची शक्ती खर्च होत आहे.

No donations should be given to make Narkasurs, this should be stopped: Sudin Dhavlikar

(सौजन्य : Goa News Bee)

अनेक लोकप्रतिनिधींकडून नरकासुराच्या प्रतिमा बनवण्यास देणगी दिली जाते. यंदा सरकारमधील महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी देणगी न देण्याचे ठरवले होते, तसेच ‘लोकप्रतिनिधींनी नरकासुराच्या प्रतिमा बनवण्यास देणग्या देऊ नयेत’, असे आवाहन वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांनी केले होते.

GOANS TO SUDIN,”DIWALI IS INCOMPLETE WITHOUT NARAKASURA”

 (सौजन्य : Prudent Media Goa) 

यावर त्यांच्यावर नरकासुर प्रतिमा बनवणार्‍यांकडून टीका झाली होती.