
प्रयागराज – शदाणी दरबारचे पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज यांच्या वंदनीय उपस्थितीत सिंध (पाकिस्तान) येथून आलेल्या ६८ हिंदूंनी सनातन संस्थेच्या कुंभक्षेत्रातील सेक्टर ९ येथील प्रदर्शन कक्षाला भेट दिली. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी आलेल्या सर्व पाकिस्तानी हिंदूंना धर्मशिक्षणविषयक माहिती दिली. अनेकांनी सनातन संस्थेची उत्पादने आणि ग्रंथ घेतले. या वेळी सनातन संस्थेचे श्री. चेतन राजहंस यांनी पू. डॉ. युधिष्ठिरलालजी यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले.

या प्रसंगी पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज म्हणाले, ‘‘या शुभप्रसंगी सनातन संस्थेचे प्रदर्शन येथे लागले आहे. बळ अथवा संख्या नव्हे, तर परिश्रम आणि साधना करून संस्थेच्या माध्यमातून धर्मप्रचार केला जात आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संस्थेची स्थापना करून गुरुकृपायोगानुसार साधनेची निर्मिती केली अन् त्यातून ते संत घडवण्याचे दिव्य कार्य करत आहेत. आमचा संकल्प एकच आहे, ध्येय एकच आहे. सनातन संस्थेचा आम्हाला अभिमान आहे. सनातन धर्मीयच भारताला विश्वगुरु बनवण्याचे ध्येय साकार करतील.’’