T Raja Singh : सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनातून भाविकांना धार्मिक ज्ञान आणि नवी दिशा मिळेल !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

ग्रंथ प्रदर्शनाच्या वेळी संवाद साधताना (डावीकडे) आमदार श्री.टी. राजासिंह, (उजवीकडे) सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, श्री. चेतन राजहंस आणि इतर मान्यवर

प्रयागराज, २९ जानेवारी (वार्ता.) – सनातन संस्थेकडून महाकुंभ प्रयागराज येथे धर्म प्रचार-प्रसारासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले आहे. पूजा करण्याची पद्धत काय ? कुंभक्षेत्री स्नान कसे करावे? त्याचे महत्त्व काय ? घरात देवघर कुठे असावे ? याविषयी माहिती देणारे हे ग्रंथ प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन पहाण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने भाविक पवित्र स्नान करण्यासाठी येत आहेत. त्यांनी अवश्य सनातनचे ग्रंथ प्रदर्शन पहावे, असे मी भाविकांना आवाहन करतो. याठिकाणी आपणास धार्मिक ज्ञान, साधनेविषयी मार्गदर्शन मिळेल. त्यातून आपल्या जीवनाला नवी दिशा मिळून जीवनात परिवर्तन होईल, असे प्रतिपादन भाग्यनगर (हैद्राबाद) येथील भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी येथे केले.

कुंभक्षेत्री सेक्टर १९ येथे लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथ आणि धर्मशिक्षण प्रदर्शनास श्री.टी. राजासिंह यांनी २७ जानेवारी या दिवशी भेट देऊन प्रदर्शनाची पहाणी केली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांची वंदनीय उपस्थिती होती. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी श्री. टी. राजासिंह यांना प्रदर्शनाची माहिती देऊन त्यांच्याशी इतर विषयांवर संवाद साधला.