बुरखा घालणे हे कट्टरतेचे लक्षण असल्याने श्रीलंका बुरख्यावर बंदी घालणार !

१ सहस्रांहून अधिक मदरसेही बंद होणार !

  • कुठे एक जिहादी आतंकवादी आक्रमण झाल्यावर अशा प्रकारचे धाडसी निर्णय घेणारी श्रीलंका, तर कुठे गेली ३ दशके सहस्रावधी जिहादी आतंकवादी आक्रमणे होऊन त्यात सहस्रो नागरिकांचा मृत्यू झाल्यावरही निष्क्रीय रहाणारा भारत !
  • भारतात मदरशांतून आतंकवादी निर्माण झाल्याचे उघडकीस येऊनही ते बंद करण्याऐवजी त्यांना सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान देऊन पोसले जात आहे, हे लक्षात घ्या !
बुरखा – अतिरेकीपणाचे लक्षण, आम्ही यावर निश्चितपणे बंदी घालू : श्रीलंकेचे सार्वजनिक सुरक्षामंत्री सरथ वीरशेखर

कोलंबो (श्रीलंका) – राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून देशात बुरख्यावर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर मी स्वाक्षरी केली आहे. तसेच १ सहस्राहून अधिक मदरसेही बंद करण्यात येणार आहेत. आता हा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीलंकेचे सार्वजनिक सुरक्षामंत्री सरथ वीरशेखर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. ‘आमच्या काळात मुसलमान महिला आणि मुली बुरखा घालत नसत. बुरखा घालणे धार्मिक कट्टरतेचे प्रतीक असून मागील काही काळातच बुरखा घालणे प्रचलित झाले आहे. त्यामुळे आम्ही बुरख्यावर बंदी घालणारच आहोत. तसेच कुणीही शाळा उघडून त्यांना हवे ते मुलांना शिकवू शकत नाही’, असेही ते म्हणाले.

श्रीलंकेचे सार्वजनिक सुरक्षामंत्री सरथ वीरशेखर

१. जिहादी आतंकवाद्यांनी चर्च आणि हॉटेल यांवर आक्रमणे केल्यानंतर वर्ष २०१९ मध्ये श्रीलंकेत बुरख्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती.

२. वर्ष २०२०मध्ये कोरोनाच्या संकटकाळात श्रीलंकेमध्ये मृतदेहांचे दफन न करता दहन करण्याचा निर्णय श्रीलंकेच्या सरकारने घोषित केला होता; मात्र त्यावर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून टीका झाल्यानंतर तो निर्णय पालटून मुसलमान नागरिकांना मृतदेहांचे दफन करण्याची अनुमती देण्यात आली होती.

जमात-ए-इस्लामीच्या माजी प्रमुखाला अटक

जमात-ए-इस्लामी या आतंकवादी संघटनेचा रशीद हज्जूल अकबर

जिहादी आतंकवादाला प्रोत्साहन दिल्यावरून श्रीलंकेमध्ये जमात-ए-इस्लामी या आतंकवादी संघटनेच्या रशीद हज्जूल अकबर या ६० वर्षांच्या माजी प्रमुखाला अटक करण्यात आली.

तो २०१९ पर्यंत २४ वर्षे जमात-ए-इस्लामीचा प्रमुख होता.