स्वित्झर्लंडमध्ये बुरखाबंदीचे उल्लंघन केल्यावर ८२ सहस्र रुपयांचा दंड करण्याचा प्रस्ताव !

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – स्वित्झर्लंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक कट्टरतावाद रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. आता या नियमाचे उल्लंघन करणार्‍यांकडून ८२ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्याच्या प्रस्ताव संसदेकडे संमतीसाठी पाठवण्यात आला आहे. स्वित्झर्लंडमध्ये मुसलमानांची लोकसंख्या ५ टक्के आहे.