बुरखा घालून आलेल्या आतंकवाद्याने फेकलेल्या ग्रेनेडच्या आक्रमणात एक हिंदु ठार, तर ३ जण घायाळ

प्रतिमात्मक चित्र

बारामुला (जम्मू-काश्मीर) – येथे १७ मेच्या दिवशी बुरखा घातलेल्या आतंकवाद्याने नव्याने उघडण्यात आलेल्या दारूच्या दुकानावर ग्रेनेडद्वारे आक्रमण केल्याने यात रंजीत सिंह या कर्मचार्‍याचा मृत्यू झाला, तर अन्य ३ जण घायाळ झाले. घायाळांमध्ये गोवर्धन सिंह, रवि सिंह आणि गोविंद सिंह यांचा समावेश आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघा आतंकवाद्यांपैकी मागे बसलेल्या आणि बुरखा घातलेल्या आतंकवाद्याने हे ग्रेनेड फेकले अन् ते पळून गेले.

संपादकीय भूमिका

  • अनेक युरोपीय देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी आहे. एवढेच नव्हे, तर इजिप्त, ट्यूनिशिया, कोसोवो यांसारख्या इस्लामी देशांतही यावर बंदी असतांना आता तशीच बंदी भारतात घालायला हवी, हेच या घटनेतून लक्षात येते !
  • काश्मीरमध्ये हिंदू अद्यापही असुरक्षित असणे, हे आतापर्यंच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !