भारत देशात समान नागरी कायदा येईल ! – श्री हालसिद्धनाथ देवाची भाकणूक

भारत देशात समान नागरी कायदा येईल ! गोरगरीब जनता गुढ्या-तोरण बांधतील !पाकिस्तानचा चौथाई कोना (एक चतुर्थांश भाग) भारताच्या कह्यात येईल! भगवा झेंडा राज्य करील!

हिंदूंनी स्वार्थाचा त्याग करून हिंदुत्वाचे स्फुलिंग प्रज्वलित केले पाहिजे! – युवराज स्वामी श्री माधवप्रपन्नाचार्यजी महाराज, उज्जैन

हिंदु राष्ट्राची स्थापनेचे दायित्व केवळ समितीचे नसून आपल्या सर्वांचे आहे. हेच कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने समिती करत आहे. २१ व्या वर्षी अर्थात् तारुण्यावस्थेत समितीच्या पदार्पणाचे आम्ही साक्षीदार आहोत, याचा फार आनंद आहे.

राष्ट्रासाठी निस्वार्थीपणे कार्य करण्याची प्रेरणा प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याकडून घ्यावी ! – प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी, पिठाधीश्वर, तपोभूमी, कुंडई

राजकीय मान्यता झुगारून देण्याचे बळ कार्यकर्त्यांनी दिले; म्हणूनच मी हे सर्व करू शकलो. हा माझा सत्कार नसून समाजाच्या ताकदीचा सत्कार आहे !

VIDEO – भारताला हिंदु राष्ट्र होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही ! – पू. श्रीरामज्ञानीदास महात्यागी, संस्थापक, तिरखेडी आश्रम, गोंदिया, महाराष्ट्र

भारतात जातीवाद, प्रांतवाद आदी निर्माण झाला आहे. हे रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र करणे अतिशय आवश्यक आहे.

अधिवेशनामुळे हिंदु राष्ट्र निर्मितीच्या विचाराला मोठे बळ प्राप्त होईल ! – प.पू. भास्करगिरी महाराज, देवगड

सर्व सुविचारांची देवाण-घेवाण होणार आहे आणि ‘हिंदु राष्ट्र निर्मिती’च्या विचाराला पुष्कळ मोठे बळ प्राप्त होणार आहे. या अधिवेशनासाठी आमच्या श्रीक्षेत्र दत्त देवस्थान, देवगडच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त करतो.

भारत हिंदु राष्ट्र व्हावे, हेच या अधिवेशनाचे स्वप्न ! – प.पू. शांतीगिरी महाराज, संभाजीनगर

भारत हिंदु राष्ट्र व्हावे, हेच या अधिवेशनाचे स्वप्न आहे. हा देश केवळ हिंदु राष्ट्रच नाही, तर विश्वगुरु बनू शकतो; कारण आपल्या देशात भारतमातेने अशा सुपुत्रांना जन्माला घातले आहे की, ज्यांच्या सामर्थ्याची आपण कोणतीही तुलना करू शकत नाही.

VIDEO : सर्व संत आणि महात्मे यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे आवश्यक ! – पू. परमात्माजी महाराज, धारवाड, कर्नाटक

जेव्हा धर्मावर अधर्म वरचढ झाला, तेव्हा भगवान परशुरामाने परशू धारण केला. अशा परशुरामाला आपण आदर्श मानले पाहिजे. ही तपस्या करण्याची नव्हे, तर युद्ध करण्याची वेळ आहे.

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

दहाव्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातीलच नव्हे, तर सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठ संघटना, त्यांचे प्रतिनिधी, राष्ट्रप्रेमी संस्था यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत होणे आवश्यक आहे. – सद्गुरु श्री. नवनीतानंद (गुरुवर्य पू. मोडक) महाराज

गोवा येथे होणारे ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ यशस्वी होणारच आहे आणि त्यासाठी मी प्रार्थनाही करत आहे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

या देशात १ घटना, १ देव, १ विधान असणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने अधिवेशनात गटचर्चा, भाषण, तसेच दिशादर्शन व्हावे – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

बेळगाव येथील ‘हिंदू एकता दिंडी’ म्हणजे भाव, चैतन्य आणि क्षात्रतेज यांचा अपूर्व संगम !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने बेळगाव येथे नुकतीच ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .