१७ सहस्रांहून अधिक घायाळांचे वाचले प्राण !

नाणीज (रत्नागिरी) – मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांतील घायाळांना तत्परतेने रुग्णालयात भरती करून चोख सेवा बजावणार्या जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकाचालकांचा रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि रत्नागिरी पोलीस प्रशासन यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या या उपक्रमामुळे १७ सहस्रांहून अधिक घायाळांचे प्राण वाचले आहेत.
रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयात रुग्णवाहिकाचालक धनेश केतकर (हातखंबा), गुरुनाथ नागवेकर (संगमेश्वर), मुकुंद मोरे (कशेडी) आणि मंगेश रसाळ (नाणीज) यांचा सत्कार राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. अन्य चौघांना प्रशस्तीपत्रे देण्यात आली. या वेळी गायकवाड यांनी त्यांच्या भाषणात संस्थानच्या कार्याचा गौरव केला. संस्थानच्या चालकांनी महामार्गावरील अनेक अपघातग्रस्तांचे प्राण वाचवले आहेत, त्याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान गेल्या १२ वर्षांपासून अपघातग्रस्तांसाठी रुग्णवाहिका सेवा देत आहे. संस्थानच्या ३७ रुग्णवाहिका असून महाराष्ट्राच्या हद्दीतील विविध महामार्गावर अविरत सेवा बजावीत आहे. संस्थानची ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी