गोवा : वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुटुंबासहित श्री लईराईदेवीचे दर्शन घेतले

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा ५० वा वाढदिवस २४ एप्रिलला थाटात आणि विविध उपक्रमांनिशी साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी शिरगाव येथील श्री लईराईदेवीचे दर्शन घेऊन तिच्या चरणी प्रार्थना करून दिनक्रमाला प्रारंभ केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मुख्यमंत्री  डॉ. सावंत यांना शुभेच्छा !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची गोमंतकियांच्या हितासाठी काम करण्याची तळमळ नोंद घेण्यासारखी आहे.’’