उज्जैन (मध्यप्रदेश) – ‘अखिल भारतीय धर्मसंघ आणि स्वामी करपात्री फाऊंडेशन’चे प.पू. समर्थ श्री त्र्यंबकेश्वर चैतन्यजी महाराज (करपात्री धाम, वृंदावन) यांची भेट घेण्यात आली. या प्रसंगी लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील स्वामी श्री देवेंद्रानंद सरस्वती महाराजही उपस्थित होते. या वेळी प.पू. समर्थ श्री त्र्यंबकेश्वर चैतन्यजी महाराज यांना गोव्यात होणार्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी आमंत्रित करण्यात आले. प.पू. समर्थ श्री त्र्यंबकेश्वर चैतन्यजी महाराज यांनी महोत्सवासाठी शुभाशीर्वाद दिले.

तसेच तेथे उपस्थित असलेले स्वामी श्री श्रीधरानंद सरस्वती महाराज (नेमावार, मध्यप्रदेश) आणि प.पू. स्वामी श्री सर्वेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांना प.पू. समर्थ श्री त्र्यंबकेश्वर चैतन्यजी महाराज यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आयोजित करण्यात येणार्या महोत्सवाविषयी सांगितले अन् त्यांनाही या कार्यास आशीर्वाद देण्यास सांगितले. सर्व संतांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच्या कार्यास आशीर्वाद देऊन पाठिंबा दिला. या वेळी प.पू. समर्थ श्री त्र्यंबकेश्वर चैतन्यजी महाराज यांनी ‘या महोत्सवाला मी येण्याचा प्रयत्न करीन’, असे सांगितले. संतांचे आशीर्वाद घेण्याच्या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया आणि श्री. शैलेंद्र सेठिया उपस्थित होते.
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची मुंबईत सभा !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !