पाकमधील हिंदु मंदिराच्या तोडफोडीच्या प्रकरणी ३० धर्मांधांना अटक

  • प्रांतीय सरकारकडून पुनर्निर्माणाचा आदेश

  • पाकच्या सर्वोच्च न्यायालयाकडूनही घटनेची नोंद

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रातांतील करक जिल्ह्यातील तेरी गावात एका मौलवीच्या नेतृत्वाखाली हिंदूंच्या मंदिराची तोडफोड करून आग लावण्यात आल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी मौलवी महंमद शरीफ, मौलाना फैजुल्लाह, जमीयत उलेमा-ए-इस्लाम पक्षाचा नेता रहमत सलाम खट्टक यांच्यासह ३० जणांना अटक केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी ३५० लोकांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. येथील प्रांतीय सरकारने मंदिराच्या पुनर्निर्माणाचा आदेश दिला आहे. या घटनेची पाकच्या  सर्वोच्च न्यायालयाने नोंद घेतली असून यावर ५ जानेवारीला सुनावणी होणार आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतरच हिंदूंनी या मंदिराचा जीर्णोद्धार आणि विस्तार करण्यास प्रारंभ केला होेता.

 (सौजन्य : NewsX)

भारत सरकारने पाककडे विरोध दर्शवला !

भारत सरकारने या घटनेचा राजनैतिक स्तरावर पाककडे विरोध नोंदवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. (घटनेच्या ३ दिवसानंतर केंद्र सरकारने विरोध नोंदवणे हिंदूंना अपेक्षित नाही ! त्यातही सरकारने अधिकृतरित्या कुठेही निषेध नोंदवलेला नाही. सरकारने ‘पाकच्या अंतर्गत प्रश्‍नांत हस्तक्षेप नको’, असाही विचार केला असेल; मात्र हा अंतर्गत प्रश्‍न नाही, तर हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न आहे, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)


Rahmat salam khattak offical
جمیعت علمإ اسلام پاکستان کے رہنمإ رحمت سلام خٹک نے ٹیری میں مندر کی توسیع کیخلاف اختجاجی مظاہرے سے خطاب کرتے ہوٸے کہا کہ اس توسیع کو افہام و تفہیم, مصلحت اور سپریم کورٹ کی روشنی میں روکا جاٸے۔۔Jamiat Ulema-e-Islam Pakistan’s leader Rehmat Salam Khattak addressing a protest against the extension of the temple in Terry and said that this extension should be stopped under the light of understanding, counsel and Supreme Court.

(स्रोत : Rahmat salam khattak offical फेसबुक)