बलुचिस्तानमध्ये बलुचींनी केलेल्या आक्रमणात पाकचे ७ सैनिक ठार 

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या बलुचिस्तानमधील बलुच लोकांच्या एका संघटनेने पाक सैन्याच्या चौकीवर आक्रमण करून ७ सैनिकांना ठार केले. या घटनेसाठी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला उत्तरदायी ठरवले आहे.

(सौजन्य : NewsX)

पाकच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार बलुचिस्तानमधील हरनाई येथील सैन्याच्या शारिग चौकीवर हे आक्रमण झाले.

या आक्रमणानंतर पाक सैन्याने सूड घेण्यासाठी स्थानिकांच्या घरात घुसून चौकशी करण्याचा प्रयत्न करत त्यांच्यावर अत्याचार करण्यास चालू केले आहे. विरोध करणार्‍यांना ‘आतंकवादी’ ठरवून ठार करण्यात येत आहे.