अलवर (राजस्थान) येथे शिवमंदिरानंतर आता गोशाळा अनधिकृत ठरवून पाडली !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने ते ठरवून हिंदूंची मंदिरे आणि गोशाळा यांवर कारवाई करून धर्मांधांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात घ्या !

नगर येथे पोलिसांच्या मारहाणीत युवक गंभीर घायाळ !

येथील मिरवणुकीत भगवा झेंडा फडकवला आणि भ्रमणभाषवर छायाचित्र ठेवले, तसेच सामाजिक माध्यमांवर झालेल्या संभाषणावरून सोनई पोलिसांनी राजेंद्र मोहिते या तरुणाला कोणत्याही गुन्ह्यात अटक न करता अमानुष मारहाण केली.

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाने काश्मिरी हिंदूंवर झालेला अत्याचार उघड करण्यात दिलेले योगदान !

हा नरसंहार झाल्यावर त्यासंदर्भात पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडे पाडण्याची अनेक वेळा संधी होती; मात्र तत्कालीन शासनकर्त्यांनी मौन पाळणे पसंत केले. मानवाधिकार संघटनांनाही हे काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार दिसले नाहीत. त्यामुळे उशिरा का होईना, हे सत्य जगासमोर आले, हेही नसे थोडके !

पुन्हा हिंदूंचे पलायन ?

राजस्थान येथील करौली येथे गुढीपाडवा अर्थात् हिंदु नववर्षदिनाला हिंदूंनी दुचाकींची फेरी काढली होती. ती फेरी धर्मांधांच्या भागात आल्यावर तिच्यावर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. तसेच तेथील हिंदूंच्या दुकानांवर दगडफेक करून त्यांची जाळपोळ करण्यात आली.

हिंदूंच्या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी मुसलमान चालकांच्या गाडीत बसू नये !

असे आवाहन करणार्‍या हिंदु संघटनांना ‘धर्मांध’ संबोधून ही समस्या सुटणार नाही, तर ‘असे आवाहन करण्याची वेळ का आली ?’, तसेच ‘त्यांना असुरक्षित का वाटू लागले आहे ?’, याची चौकशी करणे आवश्यक !

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात मधू नावाचा हिंदु युवक घायाळ !

कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता असतांना धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण करण्याचे धाडस होतेच कसे ? राज्य सरकारने अशांवर कठोर कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !

अनेक हिंदु दुकानदार संपत्ती विकून पलायन करण्याच्या सिद्धतेत !

देशात सर्वपक्षीय सरकारांच्या काळात अशा घटना आतापर्यंत घडलेल्या आहेत. राजस्थानमध्ये सध्या काँग्रेसचे राज्य आहे. त्यामुळे धर्मांधांना अधिक चेव चढला आहे. राजस्थानच्या हिंदूंनी याविरोधात संघटित झाले पाहिजे !

बांगलादेशात महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून हिंदु शिक्षकाला अटक !

भारतात हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची अनेक अश्‍लील चित्रे काढूनही त्यांना कधी अटक करण्यात आली नाही; मात्र इस्लामी देशात कथित आरोपावरून हिंदूंवर कारवाई केली जाते, हे लक्षात घ्या !

हिंदु संघटनांनी मतभेद बाजूला ठेवून हिंदु राष्ट्रासाठी संघटित व्हावे ! – अतुल जेसवानी, प्रदेशाध्यक्ष, हिंदु सेवा परिषद

आज हिंदु समाजात अभूतपूर्व जागरूकता निर्माण झाली आहे. याला आपण प्रतिकूल काळातील अनुकूलता म्हणू शकतो. अशा काळात जागरूक हिंदूंना राजकारणाकडे नाही, तर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने नेण्यासाठी आपल्याला जागृती करावी लागेल.

पिसोळी (पुणे) येथील ‘सांकला विस्टाज्’ गृहसंकुलातील श्री गणेशमूर्ती पोलिसांच्या साहाय्याने धर्मांधांनी हटवली !

पुण्यासारख्या श्री गणेशाचे स्थान असलेल्या शहरातील पोलीस धर्मांधांच्या भरीस पडून बहुसंख्य हिंदूंच्या परिसरातील श्री गणेशाची मूर्ती घेऊन जातात, हे अतिशय दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे ! असे पोलीस हिंदूंचे रक्षण करतील, असा विश्वास हिंदूंना कधी तरी वाटेल का ?