शिक्षकाच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार
भारतात हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची अनेक अश्लील चित्रे काढूनही त्यांना कधी अटक करण्यात आली नाही; मात्र इस्लामी देशात कथित आरोपावरून हिंदूंवर कारवाई केली जाते, हे लक्षात घ्या ! – संपादक
मुंशीगंज (बांगलादेश) – येथे एका हिंदु शिक्षकाला प्रेषित महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. येथील बिनोदपूर रामकुमार शाळेत ही घटना घडली असून हृदयचंद्र मंडल असे या शिक्षकाचे नाव आहे. ते विज्ञान विषय शिकवतात. त्यांनी वर्गात शिकवतांना पैगंबर आणि कुराण यांचा अवमान केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. या प्रकरणी शाळेच्या अधिकार्यांनी विद्यार्थ्यांशी तडजोड करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी नकार दिला. मंडल यांच्या विरोधात निदर्शनेही करण्यात आली.
बांग्लादेश में ईशनिंदा के नाम पर विज्ञान शिक्षक ह्रदय मंडल गिरफ्तार, इस्लाम और पैगबंर के अपमान का आरोप: जानें क्या है मामला#Bangladesh https://t.co/GPIsDBto6v
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 7, 2022
१. मंडल यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले की, विज्ञान शिकवतांना मी काही गोष्टी सांगितल्या होत्या; मात्र इस्लाम आणि पैगंबर यांच्याविषयी काहीही म्हटले नाही.
२. मंडल यांच्या पत्नी बबीता यांनी सांगितले, ‘आमच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्यात आला आहे. त्यामुळे माझ्या मुलाचे शाळेत जाणेही बंद झाले आहे. आमचे शेजारी आम्हाला शिवीगाळ करत आहेत. आम्ही स्वतःला असुरक्षित समजत आहोत.’