हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
जबलपूर (मध्यप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीच्यावतीने पार पडले हिंदु राष्ट्र अधिवेशन !
जबलपूर (मध्यप्रदेश) – राष्ट्र आणि धर्म विरोधी शक्तींचा आक्रमक पवित्रा पाहून हिंदूंनी जागृत व्हायला हवे. हिंदूंनी व्यापक हिंदु हित लक्षात घेऊन स्वतःची रणनीती बनवायला हवी. सर्व हिंदु संघटनांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्रित कार्य केल्यास हिंदु राष्ट्र स्थापनेचे लक्ष्य साकार करणे अशक्य नाही, असे प्रतिपादन हिंदु सेवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री. अतुल जेसवानी यांनी केले. ते येथील आर्य समाज मंदिरातील दयानंद भवन येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र अधिवेशनात बोलत होते. या अधिवेशनाला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.
या वेळी हिंदु जागरण मंचचे कृषी विभाग अध्यक्ष श्री. विकास खरे, हिंदु टायगर फोर्सचे प्रदेशाध्यक्ष श्री. देवेंद्र हिंदु आणि जिल्हा अधिवक्ता संघाचे माजी अध्यक्ष श्री. राजेश नायक यांनी उपस्थित धर्मप्रेमींना संबोधित केले. तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे हे ‘ऑनलाईन’ उपस्थित होते.
जागरूक हिंदूंना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने नेण्यासाठी जागृती करा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृतीसमिती आपल्याला व्याख्यान, परिसंवाद, सभा यांसारख्या उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक व्यासपिठावर आपल्याला आता हिंदु राष्ट्र स्थापनेचा उद्घोष करायला हवा. जागृतीच्या माध्यमातून हिंदूंचे प्रभावी संघटन होते, हा आपला अनुभव आहे. आज आपण ध्रुवीकरणाचा अनुभव घेत आहोत. आज हिंदु समाजात अभूतपूर्व जागरूकता निर्माण झाली आहे. याला आपण प्रतिकूल काळातील अनुकूलता म्हणू शकतो. अशा काळात जागरूक हिंदूंना राजकारणाकडे नाही, तर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने नेण्यासाठी आपल्याला जागृती करावी लागेल. |
हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्रासाठी निःस्वार्थपणे कार्य करत आहे ! – अतुल जेसवानी, प्रदेशाध्यक्ष, हिंदु सेवा परिषदहिंदु जनजागृती समिती ही एकमात्र संघटना आहे की, जी सर्व संघटनांचा समन्वय करण्यासाठी रात्रंदिवस झटत आहे, तसेच निःस्वार्थपणे कार्य करत आहे. छोट्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना मार्गदर्शन करत आहे. समितीच केवळ ‘हिंदु राष्ट्राचे ध्येय्य का ठेवले पाहिजे ?’, हे सतत सांगत आहे. सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी समितीच्या हिंदु राष्ट्राच्या कार्यात सक्रीय सहभागी झाले पाहिजे. |
लव्ह जिहादला रोखण्यासाठी हिंदु तरुणींच्या सेनेची आवश्यकता ! – सौ. लतासिंह ठाकूर, अध्यक्ष, चंडी वाहिनी
एका धर्मांध अधिकाऱ्याच्या अश्लील मागणीला धुडकावून लावण्यासाठी मला स्वत:ची सरकारी नोकरी सोडावी लागली. आजच्या तरुणींना प्रलोभने दाखवून धर्मांध तरुण जाळ्यात ओढत आहेत. ‘लव्ह जिहाद’ला सडेतोड उत्तर देऊ शकेल, अशी हिंदु तरूणींची एकत्रित सेना तयार करण्याची आज आवश्यकता आहे.
धर्मांतरबंदीचा कायदा अधिक सक्षम व्हायला हवा ! – योगेश अग्रवाल, संस्थापक, हिंदु धर्म सेना
धर्मांतराच्या समस्येने आज रौद्र रूप धारण केले आहे. हिंदु समाज ‘घरवापसी’ करत असला, तरी ती संख्या धर्मांतरितांच्या संख्येपुढे नगण्य आहे. कायद्याने आज धर्मांतरास प्रतिबंध घातलेला नाही. काही अटी सिद्ध केल्या आहेत, ज्याद्वारे धर्मांतरितास तहसीलदारांच्या समोर उभे राहून धर्मांतर करत असल्याचे सांगावे लागते. त्यामुळे काही प्रमाणात आळा बसला आहे. कायदा अधिक सक्षम झाला, तर धर्मांतरास आळा बसण्यास साहाय्य होईल. सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा समन्वय वाढला पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य आमची संघटना नेहमी करील.
हिंदूंमध्ये जाज्वल्य धर्माभिमान निर्माण करण्यास आपण प्रयत्न करणे आवश्यक ! – डॉ. एच्.पी. तिवारी, प्रांत अध्यक्ष, भारत रक्षा मंच
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदु आज असुरक्षित आहे. येत्या १० ते १५ वर्षांत या देशात धर्मांध अधिक आक्रमक होऊन या देशाची सत्ता संपादन करतील. याला रोखण्याचे मोठे आव्हान आज हिंदुत्ववादी संघटनांच्या पुढे आहे. आज हिंदु संघटनांना या समस्यांचे गांभीर्य ठाऊक असूनही त्यावर प्रत्यक्ष कृती होतांना दिसत नाही. हिंदु समाज निद्रीस्त आहे. हिंदूंमध्ये जाज्वल्य धर्माभिमान निर्माण करण्यास आपण अल्प पडत आहोत.
हिंदु राष्ट्र स्थापनेचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून करा ! – डॉ. आशिष श्रीवास्तव, मध्य भारत प्रांत संयोजक, भारतीय शिक्षण मंडळ
आपल्या समोरचे मोठे आव्हान आपले घरच आहे. आपण आपल्या (स्वत:च्या) घरात संस्कार निर्माण करण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे. माझ्या परिवारात सोळा संस्कार होतात का ? हे आपण प्रथम तपासले पाहिजे. मी माझ्या परिवारातील महिलांना गर्भाधान संस्काराचे महत्व पटवून सांगितले. त्याचा परिणाम माझ्या घरात एक धर्माभिमानी सदस्य वाढला आहे. संस्कारांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून झाला पाहिजे.
‘सेक्युलर’ (निधर्मी) देशात विशिष्ट धार्मिक मान्यतेचे हलाल प्रमाणपत्र कसे चालते ? – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून इस्लामी संस्था हिंदु व्यापाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये कमवत असून त्याचा उपयोग देशविरोधी कारवायांसाठी केला जात आहे. ही संघटना जिहादी आतंकवाद्यांना कायदेशीर साहाय्य मिळवून देत आहे. एकीकडे राज्यघटना ‘सेक्युलर’ आहे, हे हिंदूंना शिकवायचे आणि दुसरीकडे धार्मिक मान्यतेनुसार उत्पादनांना प्रमाणपत्रे वाटायची, हा प्रकार अनाकलनीय आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते.
अन्यायाच्या विरोधात न लढणे, हा दुर्गुणच हिंदू समाजाचा मोठा शत्रू ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था
९० लाख ज्यूंचा एक ‘ज्यू देश’ असू शकतो, तर १०० कोटी हिंदूंचे हिंदु राष्ट्र का नाही ? याचे चिंतन सर्वांनी करणे आवश्यक आहे. हिंदूंना आज संख्येची नाही, तर धर्माभिमानाची आवश्यकता आहे. ध्वनीप्रदूषण कायदा असूनही ५ वेळेची बांग आपण शांतपणे सहन करतो. लव्ह जिहाद सारख्या घटना गावोगावी होतात, तरी हिंदु सहन करत रहातो. हा अन्याय सहन करण्याचा दुर्गुणच आपला घात करत आहे. हिंदूंना हिंदु राष्ट्राचे महत्त्व पटवून देणे पुष्कळ आवश्यक आहे आणि त्यासाठी व्यापक जनजागृतीची आवश्यकता आहे.