पुन्हा हिंदूंचे पलायन ?

हिंहूबहुल भारतात धर्मांधांच्या भीतीमुळे हिंदूंना पलायन करावे लागणे हे लज्जास्पद !

राजस्थान येथील करौली येथे गुढीपाडवा अर्थात् हिंदु नववर्षदिनाला हिंदूंनी दुचाकींची फेरी काढली होती. ती फेरी धर्मांधांच्या भागात आल्यावर तिच्यावर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. तसेच तेथील हिंदूंच्या दुकानांवर दगडफेक करून त्यांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेविषयी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन चित्रीकरण दाखवल्यावर अत्यंत भयावह वास्तव उघडकीस आले आहे. ही दुचाकीची फेरी ज्या भागातून जात होती, तेथे बहुसंख्य धर्मांधांची वस्ती आहे, तसेच जवळ त्यांचे प्रार्थनास्थळही आहे. त्या भागात धर्मांधांच्या दुमजली इमारतींच्या वरच्या भागात म्हणजे गच्चीवर सिमेंटचे मोठे ब्लॉक होते. त्यांचे वजन १० ते १५ किलो एवढे भरेल. हे ब्लॉक दुसऱ्या मजल्यावरून हिंदूंच्या फेरीवर ढकलण्यात येत होते. एका व्हिडिओमध्ये याविषयीची दृश्ये स्पष्टपणे दिसत आहेत. त्या व्यतिरिक्त दगडांचे मोठे साठे गच्चीवर ठेवले असल्याचे दिसत होते. बांधकामाच्या साहित्यातील लोखंडी सळ्यांचा साठाही त्यात होता.

हिंदूंविरुद्ध षड्यंत्र !

हिंदूंची फेरी जवळ आल्यावर धर्मांधांनी अचानक केलेली दगडफेक आणि रॉकेल ओतून केलेली जाळपोळ यांमुळे करौली येथील घाबरलेली हिंदु कुटुंबे अन् दुकानदार यांनी ‘आमच्या मालमत्ता विकण्यासाठी आहेत’, असे फलक लावले आहेत आणि ते पलायन करण्याच्या सिद्धतेत आहेत. काही हिंदु दुकानदारांनी पलायन केले आहे. या भागात ६० वर्षांहून अधिक काळ दुकान चालवणाऱ्या दुकानदाराने व्यथा सांगितली, ‘‘आजवर एवढे भीषण आक्रमण कधी अनुभवलेले नाही. आजही त्या दिवसाचे भय आहे. आमच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथून पलायन करणे भाग आहे.’’ धर्मांधांच्या या आक्रमणाविषयी राजस्थान येथील पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, फेरीत आक्षेपार्ह गाणी लावण्यात आली होती. त्यामुळे त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. हे प्रत्युत्तर आहे कि एक षड्यंत्र आहे ? गच्चीवर एवढ्या मोठ्या संख्येत दगडांचा साठा आणि अन्य साहित्य सापडते, हा पूर्वनियोजित कट नाही का ? हिंदूंची मोजकी दुकाने जाळण्यासाठी रॉकेल एकाएकी उपलब्ध कसे होते ? गल्लीच्या दोन्ही बाजूंकडील इमारतींवर चढून धर्मांध फेरीवर दगड फेकत होते. हिंदूंच्या सणांच्या वेळी हिंदू मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि धार्मिक कृतींमध्ये व्यस्त असतात. या बेसावधपणाचा अपलाभ घेऊन त्यांच्यात भय उत्पन्न करण्यासाठीच सर्व षड्यंत्र रचले होते, असे स्पष्टपणे दिसत आहे. तरीही पोलिसांचे असे म्हणणे असेल, तर ‘हिंदूंनी कुणाच्या भरवशावर तेथे सुरक्षित रहायचे ?’ हा प्रश्न आहे. तसेच आक्षेपार्ह गाणी लावली म्हणून हिंदूंवर आक्रमण करण्याचा परवाना पोलिसांनी धर्मांधांना दिला आहे का ? राजस्थान येथे काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे ‘साहजिकच धर्मांधांना चेव चढला आहे’, असे वाटते. राजस्थान ही योद्ध्यांची भूमी आहे; मात्र तेथे होणारी हिंदूंवरील आक्रमणे, हिंदूंवरील अत्याचार यांच्या घटना पहाता आता तिचे हिंदूंसाठी असुरक्षित प्रदेशात रूपांतर होत आहे.

हिंदूंचा छळ !

यापूर्वी अशीच आक्रमणे उत्तरप्रदेशातील कैराना, हरियाणातील मेवात, गुजरातमधील सीमेलगतच्या गावांमधील हिंदूंवर झाल्यामुळे त्यांना पलायन करावे लागले होते. देहली येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या वस्तीमध्ये येऊन दादागिरी करणे, हिंदु मुलींवर अत्याचाराची धमकी देणे असे प्रकार चालू असल्यामुळे तेथील हिंदूंनीही त्यांच्या घरावर ‘हे घर विकणे आहे’, असे फलक लावले होते. या घटना मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमे आणि काही वेळा प्रसारमाध्यमे यांद्वारे प्रसारित होऊनही त्या त्या ठिकाणच्या शासनकर्त्यांनी त्याविरुद्ध काही ठोस भूमिका घेऊन हिंदूंना आश्वस्त केले, असेही झाले नाही. त्यामुळे ‘हा हिंदूंविरुद्धचा ‘लँड जिहाद’ रोखण्यात आणि तो नष्ट करण्यात शासनकर्ते अपयशी ठरले आहेत’, असेच म्हणावे लागेल.

काश्मीरमध्ये ३२ वर्षांपूर्वी ठरवून आणि अत्यंत पद्धतशीरपणे षड्यंत्र रचण्यात आले होते अन् ते होते काश्मिरी हिंदूंना हुसकावून लावण्याचे ! त्यासाठी काश्मीरमधील मशिदींमधून एकाच वेळी हिंदूंना ‘धर्मांतर करा, पळून जा अथवा मरा’, अशा धमक्या देण्यात आल्या आणि त्वरितच त्याची कार्यवाहीही करण्यात आली. हिंदू लवकर पळून जावेत, यासाठी हिंदूंवर आक्रमणे करून त्यांच्या हत्या करणे, हिंदूंची दुकाने, घरे आणि मंदिरे पेटवणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे असे अपप्रकार करण्यात आले. अगदी ३ दिवसांपूर्वीच श्रीनगर येथील मोठ्या मशिदीमध्ये ‘आझादी’च्या घोषणा पुन्हा देण्यात आल्या. हिंदूंसाठी ते बहुसंख्य असलेल्या देशात अशी विदारक स्थिती असतांना एक वादग्रस्त पत्रकार राणा अय्युब यांनी मात्र ट्वीट करून  ‘या वेळी रमझानला भारतातील २२ कोटी मुसलमानांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करावी. भारतात त्यांच्यावर अत्याचार होत आहेत’, असा सूर आळवला. हिमाचल प्रदेश येथीलच २ दिवसांपूर्वीची एक घटना आहे. तेथे वृत्तपत्र वितरणाचे काम करणाऱ्या धर्मांधाने तो नियमित वृत्तपत्र देणाऱ्या एका हिंदु कुटुंबातील १५ वर्षांच्या मुलीवर घरी कुणी नसल्याचा अपलाभ घेत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी मुलीने विरोध केल्याने धर्मांधाने तिची गळा चिरून हत्या केली. या घटनांमधून भारतात कुणाचे जीवन असुरक्षित आहे ? बहुसंख्य हिंदूंचे कि धर्मांधांचे ? याविषयी राणा अय्युब बोलतील का ? बहुसंख्य हिंदूंवर अत्याचार करूनही अल्पसंख्य धर्मांधांना असुरक्षितता कशी वाटते ? तसेच इस्लामी देशांची संघटना मुसलमानांवरील तथाकथित अत्याचारांची ढाल करून भारत सरकारला का सुनावते ? हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कटाचा भाग होत नाही का ? हिजाबचे नसलेले प्रकरण त्याला अत्याचाराचा मुलामा देऊन जगभर गाजवले जाते; पण हिंदूंवर अत्याचार झाल्याचा निषेध मात्र उमटत नाही. आज हिंदूंनी संघटित रहाण्यासह स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आणि सक्षम प्रचारयंत्रणेची निर्मिती करणे, हे यावरील काही उपाय आहेत. असे असले, तरी हिंदु राष्ट्रातच हिंदूंचे सर्वार्थाने रक्षण होईल, हे निश्चित !