|
कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता असतांना धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण करण्याचे धाडस होतेच कसे ? राज्य सरकारने अशांवर कठोर कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !
शिवमोग्गा (कर्नाटक) – येथील न्यू मंड्ली क्षेत्रामध्ये ६ धर्मांधांनी धारदार शस्त्रांचा वापर करून ‘मधू’ नावाच्या एका २२ वर्षीय हिंदु युवकावर अमानुषपणे आक्रमण केले. यात तो गंभीरपणे घायाळ झाला. मधू हा फुले विकण्याचा व्यवसाय करतो. साधारण दीड मासापूर्वी २० फेब्रुवारीला येथील धर्मांधांनी ‘हर्ष’ नावाच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर आक्रमण करून त्यांची हत्या केली होती. राज्यात चालू असलेल्या हिजाब प्रकरणामध्ये हर्ष यांनी धर्मांध विद्यार्थिनींच्या हिजाब घालून महाविद्यालयांत जाण्याच्या मागणीला विरोध केला होता.
आता घडलेल्या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षक लक्ष्मीप्रसाद यांनी माहिती देतांना सांगितले की, काही मासांपूर्वी मधू याने तौसीफ आणि त्याच्या टोळीतील धर्मांधांना सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढल्यावरून विरोध केला होता अन् त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रारही प्रविष्ट केली होती. त्याचा राग धरून तौसीफ अन् अन्य ५ धर्मांधांनी मधूवर आक्रमण केले असावे, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
Karnataka: Another Hindu youth, Madhu, stabbed by a mob that was led by one Tauseefhttps://t.co/BUiyCRggMw
— OpIndia.com (@OpIndia_com) April 8, 2022
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मधूला मूत्रपिंडाचा आजार आहे. काही आठवड्यांपूर्वीच त्याचे याच्याशी संबंधित शस्त्रकर्मही झाले होते. आक्रमणकर्त्यांनी त्याच ठिकाणी शस्त्र भोसकले. मधूने त्याच्या दुचाकीवरून घटनास्थळावरून पळ काढला आणि स्थानिक रुग्णालय गाठले. चिरु भट नावाच्या एका स्थानिक पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार आक्रमणकर्त्यांकडे एक मोठी तलवार होती. आतापर्यंत या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे.