अलवर (राजस्थान) येथे शिवमंदिरानंतर आता गोशाळा अनधिकृत ठरवून पाडली !

अलवर (राजस्थान) – येथे प्रशासनाकडून रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली केल्या जाणार्‍या कारवाईच्या अंतर्गत १७ एप्रिल या दिवशी ३०० वर्षे जुने शिवंमदिर आणि अन्य २ मंदिरे पाडण्यात आली होती. आता येथील कठूमर भागातील हनुमान गोशाळेवर ती अनधिकृत असल्याचे सांगत कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे या गोशाळेला सरकारी अनुदान मिळत आहे. येथे ४०० गायी असून त्यांच्या रक्षणाची समस्या निर्माण झाली आहे.

संपादकीय भूमिका

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने ते ठरवून हिंदूंची मंदिरे आणि गोशाळा यांवर कारवाई करून धर्मांधांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात घ्या !