भाजपचे उपमहापौर राजेश काळे पक्षातून बडतर्फ

उपमहापौर राजेश काळे यांना भाजप पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. राजेश काळे यांच्यावर महापालिका आयुक्त आणि उपायुक्त यांना खंडणीसाठी धमकावणे, शिवीगाळ करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, असे आरोप उपायुक्त धनराज पांडे यांनी दिलेल्या तक्रारीत करण्यात आले होेते.

संशयावरून आरोपीला अटक करणे, हा शेवटचा पर्याय असावा ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

देशातील पोलीस या नियमाचे प्रतिदिन उल्लंघन करून शेकडो घटनांत निरपराध्यांचा छळ करत असतात ! सनातनच्या काही निर्दोष साधकांनी ४ वर्षे हा छळ भोगलेला आहे. हे लक्षात घेता न्यायालयाने अशा पोलिसांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावा !

आय.आय.टी. प्रकल्प रहित करण्यासाठी शेळ-मेळावली येथील आंदोलकांकडून शासनाला १० दिवसांची मुदत

शेळ-मेळावली येथील नियोजित आय.आय.टी. प्रकल्प रहित करण्यासाठी येथील आंदोलकांकडून शासनाला १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

धारबांदोडा, उसगाव येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

धारबांदोडा येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अब्दुल सय्यद या धर्मांधाला पोलिसांनी १० जानेवारी या दिवशी मडगाव रेल्वेस्थानकावर अटक करून त्या मुलीची सुटका केली.

लव्ह जिहादमुळे हिंदु तरुणीची आत्महत्या

अशा प्रकरणात धर्मांधांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !

१ लाख ८५ सहस्र रुपयांची बनावट कृषी औषधे जप्त

विवेकानंद कॉम्प्लेक्समधील बोढे कृषी केंद्रातून १ लाख ८५ सहस्र रुपयांची बनावट कृषी औषधे कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे यांनी पोलिसांच्या साहाय्याने जप्त केली.

पेडणे येथे बैलांच्या झुंजी आयोजित केल्याप्रकरणी गुन्हा नोंद, दोघांना अटक

तालुक्यातील दांडोवाडो, मांद्रे येथे बैलांच्या झुंजी आयोजित केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

नाशिक येथे अल्पवयीन युवतीवर सामूहिक अत्याचार

युवतींवरील अत्याचारांची न संपणारी मालिका ! काँग्रेसने शिक्षणामध्ये धर्मशिक्षणाचा अंतर्भाव करून समाजाला साधना शिकवली असती, तर युवतींच्या सुरक्षेचा आज आहे तेवढा प्रश्‍न ऐरणीवर आला नसता !

आंध्रप्रदेशातील हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांच्या विरोधात ट्विटरवर  #SaveAndhraTemples हॅशटॅग ट्रेंड !

आंध्रप्रदेशातील मंदिरांवर आक्रमणे होत आहेत. यामुळे देशभरातून हिंदूंकडून संताप व्यक्त होत आहे. याच अनुषंगाने ९ जानेवारी या दिवशी धर्माभिमान्यांकडून #SaveAndhraTemples हा ‘हॅशटॅग’ ‘ट्रेंड’ करण्यात आला होता.

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे गोहत्या रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांध कसायांकडून गोळीबार

धर्मांध कसाई हेही आतंकवाद्यांप्रमाणे आणि सराईत गुंडांप्रमाणे पोलिसांवर गोळीबार करतात आणि अशांना वाचण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष, साम्यवादी, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष पुढाकार घेतात !