नाशिक येथे अल्पवयीन युवतीवर सामूहिक अत्याचार

युवतींवरील अत्याचारांची न संपणारी मालिका ! काँग्रेसने शिक्षणामध्ये धर्मशिक्षणाचा अंतर्भाव करून समाजाला साधना शिकवली असती, तर युवतींच्या सुरक्षेचा आज आहे तेवढा प्रश्‍न ऐरणीवर आला नसता !

नाशिक – येथील नाशिकरोड भागातील अरिंगळे मळा परिसरात १३ वर्षीय अल्पवयीन युवतीवर सहा संशयितांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना  घडली. या प्रकरणी पीडितेने तिच्या आईकडे याविषयी सांगितले असता रात्रीच्या सुमारास आईने नाशिकरोड पोलिसांकडे धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. यानुसार पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करून पथकाला त्यांच्या शोधात रवाना केले. मध्यरात्री उशिरापर्यंत पोलिसांनी एका अल्पवयीन संशयित मुलासह महिला आणि अन्य पाच युवक यांना कह्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयापुढे उपस्थित करण्यात आले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील अन्वेषण केले जात आहे.