आंध्रप्रदेशातील हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांच्या विरोधात ट्विटरवर  #SaveAndhraTemples हॅशटॅग ट्रेंड !

राष्ट्रीय ट्रेंडमध्ये चतुर्थ स्थानावर !

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

मुंबई – गेल्या १८ मासांपासून आंध्रप्रदेश राज्यातील मंदिरांवर आक्रमणे होत आहेत. यामुळे देशभरातून हिंदूंकडून संताप व्यक्त होत आहे. याच अनुषंगाने ९ जानेवारी या दिवशी धर्माभिमान्यांकडून #SaveAndhraTemples हा ‘हॅशटॅग’ ‘ट्रेंड’ करण्यात आला होता. हा ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये चौथ्या क्रमांकावर होता. यावर २० सहस्रांहून अधिक हिंदूंनी ट्वीट्स करत तेथे झालेल्या अनेक मंदिरांच्या तोडफोडीचा निषेध नोंदवला. मंदिरांवर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे, असे आवाहन करण्यासह राज्याच्या जगनमोहन रेड्डी सरकारवर मंदिरांच्या रक्षणासाठी दबाव निर्माण करण्याचीही मागणी करण्यात आली.

काही धर्माभिमान्यांचे ट्वीट्स

१. मंदिरांचे रक्षण अयशस्वी सरकारांकडे का ? मंदिरांचे सरकारीकरण थांबवून मंदिरे भक्तांच्या हातात दिली पाहिजेत.

२. आंध्रप्रदेशामध्ये चर्चची एक काच फुटली, तर एका दिवसांत ३६ जणांच्याविरोधात गुन्हा नोंदवला जातो; मात्र १२० मंदिरांवर झालेल्या आक्रमणांच्या प्रकरणी एकालाही अटक होत नाही. आंध्रप्रदेश सरकारची ही लांगूलचालनाची वैशिष्ट्यपूर्ण नीती आहे !

३. मंदिरांवरील आक्रमणे पहाता ‘आपण पाकिस्तानात रहातो आहोत का, जेथे प्रतिदिन हिंदूंच्या श्रद्धांवर आघात होत असतात ?’, असा प्रश्‍न पडतो. जर भारतात मंदिर सुरक्षित नसतील, तर अन्यत्रची कशी सुरक्षित असतील ?