पेडणे येथे बैलांच्या झुंजी आयोजित केल्याप्रकरणी गुन्हा नोंद, दोघांना अटक

पेडणे – तालुक्यातील दांडोवाडो, मांद्रे येथे बैलांच्या झुंजी आयोजित केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार ४ जानेवारीला या झुंजी आयोजित केल्या होत्या आणि यात एका बैलाचा मृत्यू झाला होता. या झुंजीविषयी माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार भा.दं.वि. ४२९ उपकलम ३४ खाली गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी अधिक चौकशीअंती बैलांचे मालक शापोरा येथील सूर्यकांत बेतकेकर आणि शिवोली येथील क्लेटो डिसोझा यांना अटक केली आहे. प्रसारमाध्यमांनी ही अनधिकृत झुंज लक्षात आणून दिल्याविषयी पोलिसांनी त्यांचे आभार मानले आहेत.