नोएडा (उत्तरप्रदेश) येथे गोहत्या रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांध कसायांकडून गोळीबार

चकमकीनंतर तिघांना अटक, तर चौघे पसार !

धर्मांध कसाई हेही आतंकवाद्यांप्रमाणे आणि सराईत गुंडांप्रमाणे पोलिसांवर गोळीबार करतात आणि अशांना वाचण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष, साम्यवादी, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष पुढाकार घेतात, हे लक्षात घ्या !

नोएडा (उत्तरप्रदेश) – येथे पोलीस आणि कसाई यांच्यात झालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तिघांवर अनेक पोलीस ठाण्यांत गोहत्यांचे गुन्हे नोंद आहेत. (कसायांवर अनेक पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद असतांना ते अशा प्रकारचे गुन्हे वारंवार करत आहेत; कारण त्यांना कठोर शिक्षा होत नाही. सरकारने अशा कसायांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आता हिंदूंनी करणे आवश्यक आहे आणि केंद्रातील भाजप सरकारने ती पूर्ण करून गाय आणि पोलीस दोघांचे अशा घटनांपासून रक्षण करावे ! – संपादक) पोलीस त्यांच्या ४ सहकार्‍यांचा शोध घेत आहेत.

येथील मायचा गावामध्ये काही जण गोहत्या करणार आहेत, अशी माहिती मिळाल्यावर पोलीस तेथे पोचले असता त्यांच्यावर कसायांकडून गोळीबार करण्यात आला. तेव्हा पोलिसांनी त्यांना प्रत्युत्तर देऊन घेरले. या गोळीबारात शाह आलम आणि गफ्फार या दोघांया पायाला गोळी लागली.