यावल (जिल्हा जळगाव) येथील पुरातन गडाची दुरुस्ती आणि संवर्धन यांसाठी जिल्हाधिकार्‍यांची बैठक !

यावलचा हा गड ३५० वर्षांपूर्वीचा आहे. त्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. या गडाच्या भिंतींना तडे गेलेले असून काही ठिकाणी झाडे उगवलेली आहेत, तर गडावर सुद्धा अशीच झाडे आहेत.

भारतीय पुरातत्‍व विभागाला लोहगडावरील अतिक्रमण हटवण्‍याची केली मागणी

मावळ तालुक्‍यातील लोहगडावर मागील काही काळापासून अतिक्रमणे वाढू लागली आहेत. सदरची अतिक्रमणे तात्‍काळ काढून टाकत लोहगड अतिक्रमणमुक्‍त करावा, या मागणीसाठी १८ जून या दिवशी मावळ तालुका, पुणे जिल्‍हा आणि पश्‍चिम महाराष्‍ट्र येथून मोठ्या संख्‍येने समस्‍त हिंदु बांधव एकवटले होते.

विशाळगडावरील दर्ग्यात पशूबळी बंदीच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार !

मुंबई उच्च न्यायालयाने दर्ग्याच्या याचिकाकर्त्यांना फटकारले !

गोवा : उद्ध्वस्त मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधीचा अहवाल सुपुर्द करण्यासाठीच्या मुदतीत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ

पुरातत्व विभागाच्या कागदपत्रांमध्ये ८०० ते १ सहस्र मंदिरे पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केल्याची माहिती आहे. त्यांनी केलेल्या पंचनाम्यामध्ये तोडण्यात आलेल्या सर्व मंदिरांची माहिती आहे. या सर्व कागदपत्रांचा अभ्यास करावा लागणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर पशूहत्या करण्यास पुरातत्व विभागाची बंदी !

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर पशूहत्या करण्यास पुरातत्व विभागाची बंदी असल्याचा आदेश काढला आहे. याचसमवेत अमली पदार्थांचा व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे.

तोरणागडाच्या बिन्नी दरवाजा मार्गावर ‘रेलिंग’चे काम अखेर चालू !

तोरणागडाच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपयांचा व्यय केला जात असतांना पर्यटकांच्या सुरक्षेकडे मात्र पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केले होते. उंच कड्यात संरक्षक कठडे (रेलिंग) नसल्याने पर्यटकांना अक्षरशः जीव मुठीत धरून चढउतार करावी लागत आहे.

गोवा : सांकवाळ येथे सापडलेल्या देवीच्या मूर्तीची तेथेच प्रतिष्ठापना करण्यासंदर्भात हिंदूंकडून विचारविनिमय

खाडीत सापडलेल्या श्री देवीच्या मूर्तीची श्रीक्षेत्र शंखावलीत रितसर प्रतिष्ठापना करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. ३१ विविध हिंदु संघटनांनी देवीची श्रीक्षेत्र शंखावलीतच पुनर्प्रतिष्ठापना व्हावी, यासाठीच्या कार्यास पाठिंबा दिला.

गोवा : पोतुर्गालहून कागदपत्रे आणण्याचे सरकारचे नियोजन स्थगित

सरकारने ही कागदपत्रे लवकरात लवकर गोव्यात आणून सार्वजनिक केल्यास त्यातून वस्तूस्थिती गोमंतकीय जनतेसमोर येईल.

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधी समितीने अहवालासाठी आणखी २ मास मागितले

जानेवारी २०२३ मध्ये समितीची स्थापना झाली आणि समितीला ३० दिवसांच्या आत सरकारला अहवाल सुपुर्द करायचा होता; मात्र समितीने आतापर्यंत केवळ प्राथमिक अहवालच सरकारला सुपुर्द केला आहे. समितीने आणखी अवधी मागितला आहे.

शिवलिंगाला हानी न पोचू देता त्याचे वैज्ञानिक सर्वेक्षण करता येऊ शकते !

ज्ञानवापीच्या परिसरात आढळलेल्या शिवलिंगाला कुठल्याही प्रकारची हानी पोचू न देताही त्याचे वैज्ञानिक सर्वेक्षण करता येऊ शकते, अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाने अलाहाबाद उच्च न्यायालयात दिली.