ASI Report On Gyanvapi : ज्ञानवापीच्या जागी पूर्वी मोठे मंदिर होते !

भारतीय पुरातत्व विभागाचा अहवाल उघड !

ज्ञानवापी

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापीच्या जागी पूर्वी मोठे मंदिर होते, असे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालात उघड झाले आहे. हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी त्यांना अहवाल मिळाल्यानंतर या त्यातील माहिती पत्रकार परिषद घेऊन उघड केली.

हे मंदिर पाडून त्याच्या खांबांचा वापर तेथे मशीद बांधण्यासाठी झाल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

यामुळे या ठिकाणी विश्‍वनाथाचे मंदिर होते आणि ते तोडून मशीद बांधण्यात आली, हे सिद्ध होत असल्याचे म्हटले जात आहे.