ज्ञानवापीचा पुरातत्व सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक होणार !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापीच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल दोन्ही पक्षांना देण्याचे जिल्हा न्यायालयाने मान्य केले आहे. लवकरच याची प्रत त्यांना देण्यात येणार आहे. यामुळे हा अहवाल सार्वजनिक होऊ शकणार आहे.

सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी हिंदु पक्षाकडून करण्यात आली होती, तर ‘सर्वेक्षणाचा अहवाल सार्वजनिक करू नये’, असा अर्ज मुसलमान पक्षाने केला होता. आता हा अहवाल सार्वजनिक झाल्यावर ‘ज्ञानवापी कुणाची होती ?’, हे स्पष्ट होणार आहे.

सौजन्य : रिपब्लिक वर्ल्ड 

१८ डिसेंबर २०२३ या दिवशी पुरातत्व सर्वेक्षण विभागाने याविषयीचा अहवाल न्यायालयात सादर केला होता. ज्ञानवापीचे १०० दिवसांपेक्षा अधिक काळ सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी अमेरिकेच्या शास्त्रज्ञांचे साहाय्य घेण्यात आले.