जळगाव येथील धर्माभिमान्यांची ॲमेझॉनला नोटीस !

धार्मिक भावना दुखावल्या म्हणून तत्परतेने कृती करणारे निरंजन चौधरी यांचे आणि त्यांना कायदेशीर साहाय्य करणारे अधिवक्ता गिरीश नागोरी यांचे अभिनंदन ! असे धर्माभिमानी आणि अधिवक्ते हीच हिंदूंची खरी शक्ती होय !

कट्टरतावाद्यांकडून हिंदूंचे मंदिर तोडले जात असतांना पाक सरकार मूकदर्शक होते !

अशा टीका-टिप्पण्यांचा पाकवर काहीही परिणाम होणार नाही. भारताने त्याला समजेल, अशाच भाषेत उत्तर देणे आवश्यक !

(म्हणे) ‘काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावेही पालटतील !’ – जावेद अख्तर, गीतकार

चीन भारताचा शत्रू आहे. अख्तर यांना शत्रूच्या देशाची संस्कृती दर्शवणारे फळाचे नाव मिरवण्यात धन्यता वाटत असेल, तर त्यांची निष्ठा शत्रूच्या देशाशी आहे, असेच समजावे का ? अशा राष्ट्राभिमानशून्य आणि शत्रूप्रेमी कलाकारांची भारताला आवश्यकता नाही !

धर्मांध जावेद अख्तर यांचा हिंदुद्वेष जाणा !

गुजरात सरकारने ‘ड्रॅगन फ्रूट’चे नाव ते कमळासारखे दिसते म्हणून ‘कमलम्’ केले. पहिले शहरांची नावे आणि आता फळांची, काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावेही पालटतील, अशी फुकाची टीका गीतकार जावेद अख्तर यांनी केली.

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे मंदिरातील पुजार्‍याची हत्या करून लूटमार !

उत्तरप्रदेशात गेल्या काही मासांत साधू, संत आणि पुजारी यांंच्या झालेल्या हत्या पहाता येथील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, हेच लक्षात येते ! राज्यात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !  

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करा !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर बंदी घालून दोषींवर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने २० जानेवारीला येथील जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी कठोर कायदा करा !

हिंदु धर्माचा अवमान करणे, देवतांचे विडंबन, साधू-संतांच्या हत्या यांच्या विरोधात कठोर कायदा केंद्र आणि राज्य येथे पारित करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रवक्ता ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्ल्याळीकर यांनी केली आहे.

प्रत्येक वेळी हिंदु देवतांचा अवमानच का ? – ओंकार शुक्ल, सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष, भाजप

‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणून सर्व दोषींवर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने मिरज प्रांत कार्यालयात देण्यात आले.

‘कल्याण’ मटक्याच्या चिठ्ठीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र छापून त्यांचा अवमान !

हिंदूंच्या देवता, संत, राष्ट्रपुरुष यांचा वेगवेगळ्या माध्यमातून अवमान करणार्‍यांवर त्वरित कठोर कारवाई करणारा कायदा केंद्र सरकारने देशात लागू करावा, अशी धर्मप्रेमींची मागणी आहे !

आता ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’वरील ‘मिर्झापूर’ या वेब सिरीजवरही बंदी घालण्याची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? ‘अ‍ॅमेझॉन’सारख्या अ‍ॅपवरून होणारे हिंदुविरोधी आणि भारतविरोधी चित्रण लक्षात घेता केंद्र सरकारने अशा सर्वच अ‍ॅपवर  तात्काळ बंदी घालणे आवश्यक !