अशी मागणी का करावी लागते ? ‘अॅमेझॉन’सारख्या अॅपवरून होणारे हिंदुविरोधी आणि भारतविरोधी चित्रण लक्षात घेता केंद्र सरकारने अशा सर्वच अॅपवर तात्काळ बंदी घालणे आवश्यक !
नवी देहली – ‘अॅमेझॉन प्राईम’ या ‘ओटीटी’ अॅपवरील ‘तांडव’ वेब सिरीजनंतर ‘मिर्झापूर’ या वेब सिरीजवरही बंदी घालण्याची मागणी आता होऊ लागली आहे. या वेब सिरीजच्या विरोधात अरविंद चतुर्वेदी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
‘मिर्झापूर वेब सिरीजमुळे प्रादेशिक, सामाजिक आणि धार्मिक भावना दुखवल्या जात आहेत’, असे चतुर्वेदी यांनी तक्रारीत म्हटले आहे. उत्तरप्रदेशात असलेल्या मिर्झापूर मतदारसंघाच्या खासदार आणि अपना दलाच्या राष्ट्रीय अध्यक्ष अनुप्रिया पटेल यांनी ‘मिर्झापूर’ वेब सिरीजच्या निर्मात्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. रितेश सिद्धवानी, फरहान अख्तर आणि भौमिक गोंधालिया हे मिर्झापूर वेब सिरीजचे निर्माते आहेत.