धार्मिक भावना दुखावल्या म्हणून तत्परतेने कृती करणारे निरंजन चौधरी यांचे आणि त्यांना कायदेशीर साहाय्य करणारे अधिवक्ता गिरीश नागोरी यांचे अभिनंदन ! असे धर्माभिमानी आणि अधिवक्ते हीच हिंदूंची खरी शक्ती होय !
जळगाव – ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारीत होणार्या तांडव वेब मालिकेच्या संदर्भात येथील धर्माभिमानी निरंजन चौधरी आणि अधिवक्ता गिरीश नागोरी यांनी ॲमेझॉन प्राइम कायदेशीर नोटीस बजावली आहे. येत्या ५ दिवसांच्या कालावधीत ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवरून आक्षेपार्ह ‘तांडव’ ही वेब मालिका हटवावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी या नोटिसीच्या माध्यमातून देण्यात आली आहे. हिंदु देवतांच्या संदर्भातील आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे निरंजन चौधरी आणि अधिवक्ता गिरीश नागोरी यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. म्हणून चौधरी यांच्या वतीने अधिवक्ता नागोरी यांनी अ प्राइम व्हिडिओला कायदेशीर नोटीस बजावली आहे. मालिका न हटवल्यास दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्याची चेतावणी त्यांनी दिली आहे.