ग्वाल्हेर येथे रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन येणार्‍या विमानाला अपघात : वैमानिकासह तिघे घायाळ

भोपाळ (मध्यप्रदेश) – ग्वाल्हेर येथे कोरोनाबाधितांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन येणार्‍या विमानाला झालेल्या अपघातात वैमानिक आणि अन्य दोघे घायाळ झाले. विमान धावपट्टीवर उतरतांना हा अपघात झाला. तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.