चीनच्या अणूबॉम्ब डागणार्‍या लढाऊ विमानांची तैवानच्या सीमेमध्ये घुसखोरी !

चीन छोट्याशा तैवानवर कशा प्रकारे दबाव निर्माण करत आहे, हे यातून लक्षात येते. चीनचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढत असून त्याच्यापासून भारतालाही धोका आहे. त्याला रोखायचे असेल, तर भारताने आक्रमक पवित्रा घेणे आवश्यक !  

तायपे (तैवान) – चीनच्या वायूदलाने तैवानला घाबरवण्यासाठी दक्षिण चीन सागरामध्ये त्याच्या सीमेमध्ये घुसखोरी केली. चीनचे अणूबॉम्ब डागू शकणारे ४ लढाऊ विमानांनी ही घुसखोरी केली. तसेच त्यांच्या समेवत १६ अन्य लढाऊ विमानेही होती. या वेळी तैवाननेही तात्काळ चीनच्या विमानांना पाडण्यासाठी विमानविरोधी क्षेपणास्त्रे तैनात केली. तसेच तैवानची लढाऊ विमानेही सिद्ध झाली होती. या स्थितीमुळे येथे तणाव निर्माण झाला होता. चीनचे वायूदल गेल्या काही मासांपासून सातत्याने तैवानच्या सीमेमध्ये घुसखोरी करत आहे. तैवान हा चीनचाच भाग असल्याचे चीनकडून सातत्याने दावा केला जात आहे.

तैवानच्या एका सुरक्षा अधिकार्‍याने सांगितले की, चिनी सैन्य अमेरिकेच्या लढाऊ नौकांना लक्ष्य करण्याचा सराव करत आहे. चीनच्या अशा कृतीमुळे येथील सुरक्षा धोक्यात आली आहे. चीनचे अणूबॉम्ब डागणारी विमाने येथे येणे ही सामान्य घटना नाही.