पाकच्या विमान वाहतूक आस्थापनांच्या विमानांतून प्रवास करू नका ! – संयुक्त राष्ट्रांची त्यांच्या कर्मचार्‍यांना सूचना

पाकच्या वैमानिकांकडे बनावट परवाने असल्याने सूचना

आतंकवादी देश असणार्‍या पाकच्या विमान वाहतूक आस्थापनांवरच संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातली पाहिजे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना ‘पाकिस्तानच्या कुठल्याही विमान वाहतूक करणार्‍या आस्थापनाच्या विमानांतून प्रवास करू नये’, असे सांगितले आहे. पाकच्या वैमानिकांकडे विमान उडवण्याचे बनावट परवाने असल्याने ही सूचना करण्यात आली आहे. गेल्या वर्षी कराचीमध्ये पाकचे प्रवासी विमान अपघातग्रस्त झाले होते. तेव्हा पाकमध्ये ४०० हून अधिक वैमानिकांकडे विमान उडवण्याचा परवानाच नाही अथवा बनावट असल्याचे समोर आले होते.