लडाख सीमेजवळ चीनच्या लढाऊ विमानांचा सराव !

नवी देहली – चीनच्या वायूदलाकडून लडाख सीमेजवळील त्याच्या तळावर सराव करण्यात येत आहे. २० ते २२ लढाऊ विमाने या सरावात सहभागी झाल्याचे दिसून आली. यात जे-११ आणि जे-१६ या विमानांचा समावेश आहे. चीनमधील होटन, गार गुंसा आणि काशगर या क्षेत्रांमध्ये हा सराव चालू असून  भारतीय सैन्य चीनच्या या सरावरावर बारीक लक्ष ठेवून आहे.