सातारा आणि कराड यांच्या पथकरमुक्तीसाठी खासदारांनी निर्णय घ्यावा ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले

पथकरमुक्तीसाठीचा निर्णय शासन स्वतःहून का घेत नाही ? यासाठी इतरांना लक्ष का द्यावे लागत आहे ?

मतदानपूर्व चाचणीमध्ये बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार येण्याची शक्यता

एबीपी न्यूज आणि सी-व्होटर यांनी बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचे सरकार येणार असल्याचे म्हटले आहे.

इचलकरंजीत पंचगंगेचे पात्र जलपर्णीने व्यापले

पंचगगा नदीपात्र जलपर्णीने व्यापले आहे. नदीघाट परिसरातही जलपर्णी मोठ्या प्रमाणात साचली आहे. त्याचा धोका जलचरांना निर्माण झाला आहे. अनेक दिवसांपासून पंचगंगा नदीतील पाणीप्रवाह थांबला होता. त्यामुळे पाण्यात शेवाळाचे प्रमाण वाढले होते. परिणामी पाण्याला हिरवट रंग आला होता.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या सभेत ४३७ कोटी रुपयांची विकासकामे संमत

यात विविध विकासकामांच्या व्ययासमवेत तरतूद वर्गीकरण, अवलोकनाच्या विषयासह विविध विकासविषयक कामांना अनुमाने ४३७ कोटी रुपयांच्या व्ययास स्थायी समितीने संमती दिली आहे.

सांडपाण्याच्या सहवासात वाढलेल्या झाडांची फळे आरोग्यास घातक असूनही त्याविषयी शासन तसेच अन्न आणि औषध प्रशासन जागृती का करत नाही ?

सांडपाण्याच्या सहवासात वाढणारी झाडे आणि भाज्या यांच्या मुळांमधून सांडपाण्यातील विषारी घटक शोषले जातात. त्यामुळे ती फळे आणि भाज्या खाण्यास अयोग्य असतात.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचे २१ हॉटस्पॉट !

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

समलैंगिक विवाह हा मूलभूत अधिकार नसल्याने त्याला मान्यता देऊ नये ! – केंद्र सरकारची देहली उच्च न्यायालयात मागणी

भारतीय दंड संहिता कलम ३७७ नुसार समलैंगिक विवाह हा अपराध मानण्यात येत होता. त्यासाठी १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद होती; मात्र ६ सप्टेंबर २०१८ या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात समलैंगिक विवाह हा अपराध नसल्याचे सांगितले होते.

कानपूर येथे मशिदींवरील अवैध भोंग्यांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे स्वाक्षरी अभियान !

अशा प्रकारांमध्ये राष्ट्रपती नव्हे, तर राज्य सरकारला अधिकार असल्याने या अभियानाची योग्य फलनिष्पत्ती मिळण्यासाठी राष्ट्रप्रेमींनी राज्य सरकारकडे याविषयी मागणी लावून धरणे अपेक्षित आहे !

आळेफाटा (पुणे) येथे वर कोबीची पोती लावून गोमांस वाहतूक, २ टन गोमांस जप्त

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होते. पोलीस प्रशासन यावर कायद्याची प्रभावी कार्यवाही करणार का ?

सोलापूर-विजापूर राज्य मार्गावरील २५.५४ किलोमीटर रस्ता केवळ १८ घंट्यांत पूर्ण

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने नुकतेच सोलापूर-विजापूर राज्य मार्गावरील रस्त्याचे चौपदरीकरण करतांना २५.५४ किलोमीटर (एक पदरी) रस्ता केवळ १८ घंट्यांत पूर्ण केला आहे. ठेकेदार आस्थापनाच्या ५०० कर्मचार्‍यांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत.