पुणे जिल्ह्यात कोरोनाचे २१ हॉटस्पॉट !

जिल्ह्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश !

पुणे – कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी ससून रुग्णालयाला भेट देऊन पहाणी केली. या वेळी रुग्णालयामध्ये डॉक्टरांपासून वॉर्डबॉयपर्यंत मनुष्यबळाची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. जिल्ह्यामध्ये कोरोनाचे २१ हॉटस्पॉट आहेत. शिरूर आणि शिक्रापूर या दोन्ही नगरपालिकांच्या परिसरात रुग्ण संख्या वाढत असल्याने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनावरील लस दिलेली असून संबंधितांनी घाबरून जाऊ नये, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.