मतदानपूर्व चाचणीमध्ये बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार येण्याची शक्यता

ममता बॅनर्जी

नवी देहली – केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील ४ राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक घोषित केल्यानंतर एबीपी न्यूज आणि सी-व्होटर यांनी मतदानपूर्व चाचणी करून ती घोषित केली आहे. यात बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचे सरकार येणार असल्याचे म्हटले आहे.

आसाममध्ये पन्हा भाजप, तर तमिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकची सत्ता जाऊन तेथे द्रमुक आघाडी सरकार येणार असल्याचे म्हटले आहे. केरळमध्ये पुन्हा माकप आघाडी सरकार, तर पुद्दुचेरीमध्ये भाजप आघाडीचे सरकार येण्याचा दावा करण्यात आला आहे. बंगालमध्ये भाजपला ९२ ते १०८, तर तृणमूल काँग्रेसला १४८ ते १६४ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.