पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या सभेत ४३७ कोटी रुपयांची विकासकामे संमत

पुणे – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांच्या कार्यकाळातील शेवटची सभा पोलीस बंदोबस्तामध्ये २६ फेब्रुवारीला रात्री पार पडली. यात विविध विकासकामांच्या व्ययासमवेत तरतूद वर्गीकरण, अवलोकनाच्या विषयासह विविध विकासविषयक कामांना अनुमाने ४३७ कोटी रुपयांच्या व्ययास स्थायी समितीने संमती दिली आहे. यात मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पाण्याच्या टाक्यांचे परिचालन आणि किरकोळ दुरुस्ती, खेळाच्या मैदानात ट्रॅक विकसित करणे, भाजी मंडई विकसित करणे, मैला शुद्धीकरण पंप हाऊसची दुरुस्ती, रस्त्यावरील पदपथ आणि सायकल ट्रॅक विकसित करणे अन् बस स्थानक उभारणे आदी कामे प्रस्तावित आहेत.