सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाची १२५ कोटी रुपयांची देयके थकीत ! – चंद्रकांत पाटील, उच्च तंत्र शिक्षण मंत्री

हिवाळी अधिवेशनामध्ये सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनुषंगाने ५५ सहस्र कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. त्यांना संमती मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही एक मासामध्ये पूर्ण होईल.

ठाणे येथे विजेचा धक्का लागून ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू !

या प्रकरणात उत्तरदायी असणार्‍यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करायला हवी !

गृह विभागाच्या प्रयोगशाळांमध्ये डी.एन्.ए. चाचण्यांसाठी लागणारे किट्स उपलब्ध नाहीत ! – ठाकरे गट

काही अतीमहत्त्वाच्या खटल्यांमधील लोकांना अप्रत्यक्ष साहाय्य करण्यासाठी या किट्सचा तुटवडा निर्माण केला असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

पुणे येथे इंग्रजी माध्यमाच्या अनधिकृत १६ शाळा कायमच्या बंद !

शाळांकडे ना हरकत प्रमाणपत्र, संलग्नता प्रमाणपत्र आदी कागदपत्रे नसल्यास अशा शाळांवर आर्.टी.ई. २००९ च्या अनुषंगिक शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करून त्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

‘वेब सिरीज’मुळे भारतीय संस्कृती बिघडत आहे ! – धर्मगुरु देवकीनंदन ठाकूर

‘ज्या पद्धतीने आपण जानेवारी २०२४ च्या दृष्टीने राममंदिराची सिद्धता करत आहोत, तशीच सिद्धता येत्या जानेवारीत श्रीकृष्ण मंदिराचीही करा’, असे आवाहन त्यांनी केले.

अडीच कोटी रुपयांच्या १६ लाख विदेशी सिगारेट जप्त !

एअर कार्गोमधून चादरीच्या नावाखाली विदेशी सिगारेटच्या तस्करीचा प्रयत्न करण्यात येत होता; पण महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने या प्रकरणात १६ लाख विदेशी सिगारेट जप्त केल्या आहेत.

मुंबई ते अयोध्या रेल्वे चालू व्हावी ! – मुख्यमंत्री

मुंबई-अयोध्या रेल्वेगाडी चालू व्हावी, अशी इच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ३१ डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जालना-मुंबई ही ‘वंदे भारत’ रेल्वे आल्यावर त्यांनी तिचे स्वागत केले.

‘हिंदु राष्ट्रा’तील शिक्षणपद्धत अशी असेल !

‘हिंदु (ईश्‍वरी) राष्ट्रातील शिक्षणपद्धत कशी असेल ?’, असा प्रश्‍न काही जण विचारतात. त्याचे उत्तर आहे, ‘नालंदा आणि तक्षशिला विश्‍वविद्यालयांत ज्याप्रमाणे १४ विद्या आणि ६४ कला शिकवायचे, त्याप्रमाणे शिक्षण दिले जाईल; मात्र त्यांत या माध्यमांतून ‘ईश्‍वरप्राप्ती कशी करायची ?’, हेही शिकवले जाईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संपादकीय : श्रीरामाच्या आगमनापूर्वी…!

‘राममंदिराचे राजकारण करू नये, राम सर्वांचाच आहे’, असे म्हणणार्‍यांनी राममंदिरासाठी काय संघर्ष केला ? हेही उघडपणे सांगावे !

काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना जामीन आणि शिक्षा यांची स्थगिती सत्र न्यायालयाने नाकारली !

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यात ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा झालेले काँग्रेसचे सावनेर येथील आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांचे विधानसभा सदस्यत्व रहित करण्यात आले.