Bengaluru Blast : बेंगळुरूच्या रामेश्‍वरम् कॅफेमध्ये बाँबस्फोट : ९ जण घायाळ !

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील प्रसिद्ध रामेश्‍वरम् कॅफेमध्ये १ मार्च या दिवशी झालेल्या स्फोटात ९ जण घायाळ झाले. स्वयंपाकघरातील एका सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती दिली जात होती; मात्र हा बाँबस्फोट होता, अशी माहिती राज्याचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.

सौजन्य : विऑन 

यासंदर्भात बेंगळुरूचे भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी ‘एक्स’वरून आरोप केला होता की, हा स्फोट सिलिंडरमुळे झालेला नाही, तर हा बाँबस्फोटच आहे.

ते म्हणाले की, मी कॅफेमालक नागराज यांच्याशी बोललो. ते म्हणाले की, ‘कुणा व्यक्तीने कॅफेमध्ये एक बॅग आणून ठेवली. त्यामुळे स्फोट झाला आहे.’ यातून हे स्पष्ट होते की, हा बाँबस्फोटच होता.

संपादकीय भूमिका 

जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालणार्‍या काँग्रेसच्या राज्यांत पूर्वीही बाँबस्फोट होत होते आणि आताही होत आहेत. ‘काँग्रेस म्हणजे बाँबस्फोट’, हे समीकरण लक्षात घ्या ! कर्नाटकात काँग्रेसला मते देऊन सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंना आतातरी पाश्‍चात्ताप होत आहे का ?