SC Notice To SBI : निवडणूक रोख्‍यांच्‍या प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍टेट बँक ऑफ इंडियाला बजावली नोटीस !

या प्रकरणात स्‍टेट बँक ऑफ इंडिया लपवाछपवी करत आहे, असेच एकंदर जनतेला दिसून येत आहे !

Yediyurappa POCSO : कर्नाटकचे माजी मुख्‍यमंत्री येडियुरप्‍पा यांच्‍याविरुद्ध पॉक्‍सो कायद्यातंर्गत गुन्‍हा नोंद

त्‍यांच्‍या विरोधात एका १७ वर्षांच्‍या मुलीच्‍या आईने लैंगिक अत्‍याचाराची तक्रार केल्‍यानंतर हा गुन्‍हा नोंदवण्‍यात आला.

France Emmanuel Macron : युरोपने रशियाला उत्तर देण्‍यासाठी सिद्ध रहावे ! – फ्रान्‍सचे राष्‍ट्राध्‍यक्ष इमॅन्‍युएल मॅक्रॉन

शांततेचा अर्थ असा नाही की, युक्रेनने आत्‍मसमर्पण करावे. शांतता हवी आहे; म्‍हणून पराभव स्‍वीकारणे योग्‍य नाही. जर शांतता हवी असेल, तर युक्रेनला वार्‍यावर सोडून चालणार नाही.

प्रदूषणामुळे पुणे येथील इंद्रायणीकाठी पुन्हा एकदा मृत माशांचा खच !

इंद्रायणी नदी प्रदूषणाविषयी लक्ष घाला ! असे सांगावे का लागते ? प्रशासन स्वत:हून लक्ष कधी घालणार ?

तुर्भे येथील पदपथांवर आंब्याच्या लाकडी पेट्यांचे अतिक्रमण !

तुर्भे विभाग कार्यालय आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या दुर्लक्षाचा परिणाम !

मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी राज्यशासनाची समिती पाठपुरावा घेणार !

सेवानिवृत्त भारतीय विशेष सेवेतील निवृत्त अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यशासनाने १४ मार्च या दिवशी समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळा’चे सचिव हे सदस्य म्हणून कार्यरत असतील.

निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे विद्यार्थ्यांना वारंवार जुलाबाचा त्रास !

संचालकांनी आश्वासने देऊन काय उपयोग ? विद्यार्थ्यांच्या तक्रारींची वेळीच नोंद का घेतली नाही, हे सांगावे ! विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हानीला उत्तरदायी असणार्‍या संचालकांवरही कारवाई व्हायला हवी !

ISIS : ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्यांकडून दरोडा घालून बाँबचे साहित्य खरेदी केल्याचे ‘ए.टी.एस्.’च्या अन्वेषणात उघड !

ए.टी.एस्.ने गेल्या वर्षी पुणे, मुंबई शहरात घातपाती कारवाया करण्याच्या सिद्धतेत असलेल्या शहानवाज खान, महंमद युनूस महंमद याकू आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली होती.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ७ सहस्र ५०० शाळांमध्ये राबवण्यात येणार ‘पर्यावरण सेवा योजना’ !

प्रत्येक वर्षी १ सहस्र अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने ५ वर्षांत ही योजना राबवण्यात येणार आहे. शाळेच्या नियमितच्या वेळेसह आठवड्यातील ३ घंटे निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

मुंबई पोलिसांच्या कामाचे ८ घंटे होण्याची शक्यता !

५० टक्क्यांपेक्षा अधिक पोलीस ठाण्यांतील पोलिसांना १२ घंटे कामावर उपस्थित रहावे लागते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या कामाचे ८ घंटे होण्याविषयी मोठी चर्चा झाली; परंतु कोरोना महामारीच्या काळात त्यांना १२ घंटे कामावर यावे लागत होते.