करंजी (जिल्हा अहिल्यानगर) – पैगंबर यांच्या जयंतीनिमित्ताने तिसगाव येथे जामा मशिदीपासून मिरवणूक काढण्यात आली. ‘पैगंबर यांनी जगाला दिलेला शांततेचा आणि अहिंसेचा मार्ग प्रत्येक समाजाने स्वीकारला, तर जगामध्ये सुख-समृद्धी नांदत राहील. स्वतःच्या धर्माचा आदर करतांना इतरांच्या धर्माचा अनादर करू नये. सर्वच घटकांतील व्यक्तींनी सर्व समाजातील महिला मुलींचे संरक्षण आणि सन्मान करावा’, असा संदेश मिरवणुकीच्या निमित्ताने देण्यात आला होता; पण मिरवणुकीमध्ये क्रेनला मोठा सुरा लावलेला होता. (शांततेचा संदेश पंथाच्या अनुयायांना कोण देणार ? तसेच मिरवणुकीत सुरा लावण्याचे कारण काय ? – संपादक)