मुंबई – शिक्षणविरोधी धोरणांच्या विरोधात २५ सप्टेंबर या दिवशी राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांनी धरणे आंदोलन केले. राज्यातील ५० सहस्र प्राथमिक शाळा बंद होत्या. मुंबई शहर आणि नवी मुंबईमधील काही शाळा चालू होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यातील शिक्षकांनी रजेचा अर्ज केला होता.
१. पुणे, कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे दौरे असल्यामुळे येथील आंदोलन पुढे ढकलण्यात आले.
२. संभाजीनगरमध्ये गृहमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे तेथे मोर्चा काढण्यास अनुमती नाकारण्यात आली. गृहमंत्र्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा असल्यामुळे तिथे शिक्षकांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले.